मोठमोठे टॉवर्स मिरवणाऱ्या आणि झगमगणाऱ्या आजच्या मुंबईत अवघ्या ५० ते ६० वर्षांपूर्वी तब्बल १९ तमाशा थिएटर्स होती यावर आज कोणी तरी विश्वास ठेवेल का? तो काळ जगलेले मधुकर नेराळे तो सगळा इतिहास घेऊनच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या १९ तमाशा थिएटर्सपैकी हनुमान थिएटर हे भर लालबागमधले तमाशा थिएटर त्यांच्या वडिलांनी १९४९ मध्ये सुरू केले होते. आत्ताच्या लालबागच्या चिवडा गल्लीच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली झाडेझुडपे काढून, जागा मोकळी करून, कनाती लावून तिथे सुरुवातीला हनुमान थिएटरच्या तमाशांचे फड रंगत. वडिलांनंतर मधुकर नेराळे यांनी हनुमान थिएटर चालवलेच शिवाय शाहिरी, तमाशा या अगदी खास मराठी लोककलांचा डोलाराही आपल्या खांद्यावर पेलून धरला. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना, तमाशा कलावंतांच्या संघटना उभारणे, शाहीर, तमाशा कलावंत यांचे प्रश्न सरकारदरबारी नेऊन ते सोडवून देणे, त्यांना निवृत्तिवेतनासह वेगवेगळ्या प्रकारची सरकारी मदत मिळवून देणे, सरकारच्या कलावंत मानधन समितीतील सहभाग अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्याच, त्याशिवाय ते स्वत: शाहीर होते. आपल्या मुलाची गाण्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना पंडित राजाराम शुक्ला यांच्याकडे गाणे शिकायला धाडले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिक्षण, गाणे थांबले, पण घडणे सुरू झाले.
व्यक्तिवेध: मधुकर नेराळे
मोठमोठे टॉवर्स मिरवणाऱ्या आणि झगमगणाऱ्या आजच्या मुंबईत अवघ्या ५० ते ६० वर्षांपूर्वी तब्बल १९ तमाशा थिएटर्स होती यावर आज कोणी तरी विश्वास ठेवेल का? तो काळ जगलेले मधुकर नेराळे तो सगळा इतिहास घेऊनच काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-11-2024 at 03:02 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyaktivedh madhukar nerale tamasha theatres hanuman theatre lalbagh amy