अक्साई चीनमध्ये टेहळणी करणारे, १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तानात (बांगलादेश) अकस्मात हल्ला चढवत पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणारे युद्धनायक मेजर जनरल राजेंदर नाथ (निवृत्त) यांचे चंडीगढ येथे ९८ वर्षी निधन झाले. सैन्य दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांचे नेतृत्व कौशल्य ठळकपणे अधोरेखित झाले होते. १९४६ मध्ये ते भारतीय लष्करी प्रबोधिनीत दाखल झाले. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना ११ गोरखा रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. लष्करी गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना अक्साई चीन परिसरात टेहळणी करणारे ते पहिले अधिकारी बनले. १९७१ च्या युद्धात नाथ यांनी ६२ माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व केले. शत्रूला सुगावा लागू नये म्हणून सैन्याची हालचाल, तैनाती बेमालूमपणे करण्यात आली. त्यांच्या ब्रिगेडने पूर्व पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणे काबीज केली. मधुमती नदी काठावरील लढाई सर्वाधिक रोमहर्षक ठरली. कुमारखली शहर काबीज करण्यासाठी रात्रीतून चपळाईने हालचाली करण्यात आल्या. चिलखती रेजिमेंटचे रशियन बनावटीचे पीटी – ७६ रणगाडे नदीपात्रातून पलीकडे नेण्यात आले. ब्रिगेडने असा हल्ला केला की, कमांडर मेजर जनरल अन्सारी यांच्यासह पाकिस्तानच्या नऊ डिव्हिजनला आत्मसमर्पण करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. या मोहिमेची यशस्विता लक्षात घेऊन ६२ माउंटन ब्रिगेड हा दिवस ‘मधुमती दिवस’ म्हणून साजरा करते. पश्चिम कमांड मुख्यालयात चंडी मंदिरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यालाही ‘मधुमती मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. युद्धानंतर नाथ यांनी जम्मू- काश्मीरमधील पायदळ विभागाचे नेतृत्व केले. वेलिंग्टनस्थित डिफेन्स सव्‍‌र्हिसेस स्टाफ महाविद्यालयात प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. भारतीय लष्करी प्रबोधिनीचे कमांडंट म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ते सैन्य दलातून निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर चंडीगढस्थित सोसायटी फॉर द केअर ऑफ द ब्लाइंड संस्थेच्या कार्यात त्यांनी स्वत:ला गुंतवले.. आठ विद्यार्थ्यांसह एका गॅरेजमधून चालणाऱ्या त्या शाळेचे स्वरूप पालटले. आता स्वतंत्र वर्गखोल्या, कार्यालय, मुला-मुलींची वसतिगृहे, स्वयंपाकघर, व्यायामशाळा, संगणक प्रयोगशाळा व अन्य सुविधांनी शाळा परिपूर्ण असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. शिवाय टंकलेखन, ब्रेल स्टेनोग्राफी आणि संगीताचे प्रशिक्षणही दिले जाते. देशातील ही सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून गणली जाते. या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा नाथ यांनी प्रदीर्घ काळ सांभाळली. सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल चंडीगढ प्रशासनाने त्यांचा गौरवही केला. चंडीगढ महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
shahbaz sharif government approves bill to extend army chief service tenure in pakistan
विश्लेषण : पाकिस्तानात शरीफ सरकारचा आत्मघातकी निर्णय… लष्करप्रमुखांचा कार्यकाळ दहा वर्षे… भारताची डोकेदुखी वाढणार?
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Former Minister Ashok Shinde, Shivsena, uddhav thackeray
माजी मंत्री अशोक शिंदे स्वगृही, पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…