अभिजातता टिकवायची कशी, जातिभेदांनी बरबटलेल्या समाजात ‘शास्त्रीय नृत्यप्रकार’ म्हणून कशाला मान्यता मिळण्याची शक्यता नव्हती, असा काळ सरल्यावर, आता लोकशाहीच्या आणि मानवी समतेसारख्या संकल्पनांच्या प्रकाशात ‘शास्त्रीय, अभिजात नृत्यशैली’चा पुनर्शोध घ्यायचा कसा आणि त्या नृत्यप्रकाराचे शास्त्रोक्त प्रमाणीकरण करायचे कसे, या प्रश्नांना थेट भिडणाऱ्यांमध्ये मायाधर राऊत यांचाही समावेश होता. ‘ओडिसी असा काही निराळा नृत्यप्रकार नाही- हे सारे भरतनाट्यमचेच उपप्रकार’ असा दावा खुद्द भरतनाट्यमच्या ‘संशोधक’ आणि गुरू रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी केलेला असताना, ‘नाही, आमचा ओडिसी हा निराळा नृत्यप्रकारच आहे आणि त्यालासुद्धा शास्त्रीयच आधार आहे’ असे सिद्ध करण्याची धमक दाखवणाऱ्या पाच जणांपैकी मायाधर राऊत हे वयाने सर्वांत धाकटे, पण सर्वाधिक उत्साही आणि योजक. त्यांच्या निधनामुळे, ओडिसी नृत्याचा अभिजात, शास्त्रीय दर्जा स्वप्रयत्नाने खेचून आणणाऱ्यांपैकी अखेरच्या इतिहासपुरुषाचा अस्त झालेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा