पॉलिथिन आययूडी (इन्ट्रा युटेरियन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस) या गर्भधारणारोधकाचा शोध लावून अनेक महिलांना गर्भपाताच्या वेदनांतून मुक्तता मिळवून देणारे आणि गर्भपातामुळे होणारे मातामृत्यू रोखण्यास हातभार लावणारे पद्माश्री डॉ. रुस्तम सूनावाला यांचे नुकतेच वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. कपूर आणि बच्चन कुटुंबीयांसह अनेक सेलिब्रिटींचे डॉक्टर म्हणूनही डॉ. सूनावाला ओळखले जात.

डॉ. रुस्तम सूनावाला हे भारतातील अशा डॉक्टरांपैकी एक होते, ज्यांनी देशाच्या आरोग्य क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले. ते या क्षेत्रात आले १९४८ साली. तो काळ रुग्णाची नाडी पाहून समस्येचे निदान करण्याचा होता. रक्ताच्या चाचण्या वगैरे तेव्हा सर्रास होत नसत. १९५५ ते १९७० दरम्यान या क्षेत्रात वेगाने प्रगती होत गेली. एक्स-रे, सोनोग्राफीपासून आजच्या अत्याधुनिक पिनहोल सर्जरीपर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासाचे डॉ. सूनावाला साक्षीदार होते.

Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट १९७१’ संमत होण्यात डॉ. सूनावाला यांचे योगदान मोलाचे होते. त्या काळात मूल हवे की नको हे ठरविणे महिलांच्या हाती नसे. वारंवार होणाऱ्या बाळंतपणांनी मातेच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत. गर्भपातास कायदेशीर मंजुरी नव्हती, त्यामुळे त्यासाठी अघोरी मार्ग स्वीकारले जात. गर्भपातादरम्यान वा नंतर होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण शंभरास वीस एवढे प्रचंड होते. डॉ. सूनावाला तेव्हा परळ येथील वाडिया रुग्णालयात सेवेत होते. तिथे वरचेवर अशा हतबल महिला येत. त्यांची अवस्था पाहून डॉ. सूनावाला यांनी गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. गर्भधारणा रोखण्यासाठी पॉलिथिन आययूडीचा शोध लावला. ही पद्धत त्या काळात उपलब्ध गर्भरोधक उपायांपेक्षा अधिक सुरक्षित होती आणि ती आजही वापरात आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना केल विद्यापीठाने १९८४ मध्ये मानाचा ‘वॉन ग्रफेनबर्ग पुरस्कार’ प्रदान केला, तर १९९१मध्ये त्यांना ‘पद्माश्री’ने सन्मानित करण्यात आले. ते ‘इंडियन सोसायटी ऑफ प्रीनेटल डायग्नोसिस अॅण्ड थेरपी’चे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी कुटुंबनियोजन आयोगाच्या मानद वैद्याकीय संचालकपदाचीही धुरा वाहिली. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते ब्रीच कँडी रुग्णालयाचे सल्लागार होते. त्यांचा हा प्रदीर्घ प्रवास रश्मी उदय सिंग यांनी ‘लाइफगिव्हर’ या चरित्रात शब्दबद्ध केला आहे.

डॉ. सूनावाला अनेक चित्रपट- तारेतारकांचे, विशेषत: कपूर कुटुंबाचे डॉक्टर म्हणून ओळखले जात. करीना कपूरच्या आणि तिचा मुलगा तैमुरच्याही प्रसूतीवेळी डॉ. सूनवाला यांनीच उपचार केले. रणबीर कपूर आणि राहाबाबतही तेच. विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिकाचा जन्म त्यांच्याच देखरेखीखाली झाला. सेलिब्रिटीजच्या दोन पिढ्यांचे ते डॉक्टर होते. त्यांनी अनेक उत्तमोत्तम डॉक्टर घडविले. सहकारी आणि रुग्णांमध्ये त्यांची एक आनंदी, मृदुभाषी आणि मदतीस तत्पर तज्ज्ञ अशी प्रतिमा होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब वैद्याकीय व्यवसायात आहे. वडील डॉ. फिरोज सूनावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून- १९२० पासून सेवा देत होते, तर भाऊ आणि दोन्ही मुलगे विविध वैद्याकीय शाखांचे तज्ज्ञ आहेत. तुम्ही निवृत्त होता आणि शरीर व मेंदूचा वापर बंद करता, त्या क्षणापासून तुमची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू होते, असे म्हणत सूनावाला प्रदीर्घ काळ कार्यरत राहिले.

Story img Loader