मकरंद मुळे
शिवप्रेरणा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात सजग रहो अभियान सुरू झाले आहे. विवेकाचे जागरण करून जाती, भाषा भेदांच्या पलीकडचा बंधुभावयुक्त महाराष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा संकल्प ‘सजग रहो!’ अभियानातून केला जाणार आहे. याची राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुणे येथे झाली. यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्राचे देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्थान अधोरेखित केले. अशा प्रकारचा होणारा जागर महाराष्ट्रासाठी उपयुक्त आणि आवश्यक आहे यावर एकमत झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राजकीय लढत होत आहे. प्रचाराचा कल्लोळ सुरू झालेला आहे. रणधुमाळीला वेग येत आहे. पुढचे काही दिवस राजकीय आवाज महाराष्ट्राला व्यापून टाकणार आहे. महासंग्रामाच्या कल्लोळात सर्वसामान्यांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्याशी संवाद करण्यासाठी ‘सजग रहो!’ अभियान कार्यरत झालेले आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदारांशी थेट संवाद साधण्याचे खुले व्यासपीठ आहे. निवडणूक काळात मतदार व्यक्त होत असतात. राजकीय घडामोडींवर आपले मत मांडत असतात. प्रचाराच्या बातम्या जाणून घेत असतात. आपल्या राजकीय, वैचारिक भूमिकेनुसार प्रतिसाद देत असतात. निवडणुकीनिमित्त एक मोठी घुसळण होत असते. अशा घुसळणीला सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न ‘सजग रहो!’ करणार आहे.

Israel vs iran loksatta article
अन्वयार्थ: वादळापूर्वीची शांतता…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ulta chashma manoj jarange patil
उलटा चष्मा: २४ तासांत ८००!
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

हेही वाचा : उलटा चष्मा: २४ तासांत ८००!

छत्रपती शिवाजी महाराज, संतवृंद, स्वातंत्र्य योद्धे यांनी त्या वेळी समाजाला सावध करून परिस्थितीची जाणीव करून दिली होती. व्यापक जागृतीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य उभारले होते. ती जागरणाची परंपरा अनेक मान्यवरांनी पुढे नेली आहे. त्या परंपरेचे वहन म्हणजे ‘सजग रहो!’ अभियान आहे.

राज्यात एक संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. मतदारांना विवेकबुद्धीने सक्रिय व्हावे लागणार आहे. यासाठी राज्यातील महाराष्ट्र हितैषी व्यक्ती, सामाजिक संघटना, मित्र मंडळ, व्याख्यानमाला आयोजक, विचारवंत, साहित्यिक, कलाकार असे सगळे सजग एकत्र येऊन शिवप्रेरणा उपक्रमांतर्गत ‘सजग रहो!’ अभियान करत आहेत. व्याख्यानं, परिसंवाद, चर्चा यातून महाराष्ट्र धर्माचे जागरण केले जाईल. राज्यावर घोंघावणारे विकास विरोधाचे, जातीय आकसाचे, भाषिक संकुचिततेचे मळभ दूर करून प्रगतिशील महाराष्ट्राचा मार्ग विस्तारला जाईल. महाराष्ट्र प्रथम अशी भावना असणारे यात सहभागी होत आहेत. १०० टक्के तसेच सकारात्मक मतदान, भेदापलीकडचे विकासासाठी मतदान या भूमिकेतून ही चळवळ सुरू आहे. पक्षीय राजकारणापासून दूर तरी महाराष्ट्रीय राजकारणाचा वेध घेणाऱ्या या उपक्रमाचे नेतृत्व साहित्य, कला, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींकडे आहे.

निवडणूक लढवणे हे प्रामुख्याने राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांचे काम असे स्वरूप होते. त्यामुळे विरोध, आरोप, प्रत्युत्तर याचे स्वरूप मर्यादित होते. परंतु. २०२४ च्या लोकसभेत आणि विशेषत: सध्याच्या विधानसभा निवडणुकीत लढणाऱ्या राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या शक्ती ही सामाजिक स्थैर्य आणि शांतता या दृष्टीने काळजीची बाब आहे. ‘सजग रहो!’ त्या अदृश्य, अमूर्त शक्तींचे उपद्रव मूल्य सांगणार आहे. थेट मतदारांना एकमेकांच्या विरोधात लढवणाऱ्या आणि मन दुखावणाऱ्या दाहक अजेंड्याची पोलखोल जागल्याच्या भूमिकेत ‘सजग रहो!’ करणार आहे.

हेही वाचा : अन्वयार्थ: वादळापूर्वीची शांतता…

‘सजग रहो!’च्या माध्यमातून राज्याच्या सद्या:स्थितीवर बोलले जाणार आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांतील घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडचे महाराष्ट्राला घेरणाऱ्या घटनांवर भाष्य केले जाईल. तर, विकासाकड? नेणाऱ्या राजकारणाचा वेध घेतला जाणार आहे. जातीय भेदाचे वातावरण आणि त्या उलट सर्वस्पर्शी कामाला चालना यातील फरक मांडला जाणार आहे. विरोधाच्या राजकारणाचा द्वेषाकडे जाणाऱ्या लंबकामुळे बिघडणाऱ्या राज्यातील स्थैर्यावर उपाययोजनेची चर्चा केली जाईल.

हेही वाचा : संविधानभान: लोकशाहीचा अद्भुत प्रयोग!

राज्यातील हिंदुत्वाचे विषय जे थेट शासकीय व्यवस्थेशी संबंधित आहेत, त्यावर वैचारिक आणि व्यावहारिक पातळीवर जागर केला जाईल. हिंदूपणाच्या सबलीकरणात राज्याचे हित सामावले आहे, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली जाईल. ज्या महाराष्ट्राची क्षमता सर्व स्तरांवर देशाचे नेतृत्व करण्याची आहे त्या क्षमतेची आठवण करून देऊन संकुचितता निर्मूलनाचे आवाहन केले जाईल. राजकीय धामधूम आणि कुरघोडीची खेळी यातून राज्याला प्रदूषणमुक्त करण्याचे रचनात्मक पाऊल म्हणजे ‘सजग रहो!’ आहे. विवेकाचे जागरण करून समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचे ध्येय ठेवले आहे. नकारात्मकतेवर मात करून सकारात्मकता जागवण्याचे काम करण्याला प्राधान्य दिले जात आहे. जात, भाषा, पंथ या भेदाच्या पलीकडे असलेला राज्यातील व्यापक बंधुभाव टिकवण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. द्वेष भावनेच्या मानसिकतेवर टीका करण्याऐवजी ऐक्य, स्नेह रुजवण्याची थेट कृती म्हणजे ‘सजग रहो!’ आहे.

प्रतिक्रियावादी होण्याऐवजी राज्याची घडी बसवण्याची सामूहिक, विधायक प्रक्रिया म्हणजे ‘सजग रहो!’ आहे.

(लेखक पत्रकार, राजकीय-सामाजिक विश्लेषक, ‘सजग रहो!’चे समन्वयक आहेत.)

Story img Loader