चंद्रशेखर बावनकुळे
कार्यकर्ता हाच भाजपच्या महाविजयाचा खरा शिल्पकार आहे आणि भविष्यातील प्रत्येक विजयाचे शिल्पदेखील कार्यकर्त्यानेच साकार करावयाचे आहे. हा संदेश देऊन महाराष्ट्र काबीज करण्याच्या महाविजय मोहिमेचा प्रारंभ शिर्डीत भाजपच्या महाविजय अधिवेशनाने झाला. विजयोत्सव साजरा करण्याकरिता असा मेळावा आयोजित करून भाजपने आपल्या भविष्यातील वाटचालीची नीती स्पष्ट केली आहे. २०२४ या वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीतून नेत्यांच्या विजयाची हमी कार्यकर्त्यांनी घेतली होती. आता, प्राणपणाने झुंजलेल्या कार्यकर्त्यांना विजयी करण्याची शाश्वती नेत्यांनी घेतली आहे, म्हणूनच २०२५ हे वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित.

शिर्डीचा मेळावा विजयोत्सवाचा होता असे म्हटले जात असले, तरी यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्यांस आणि नेत्यांसही, नव्या जबाबदारीच्या जाणिवांचे भान देण्याचे काम केले. म्हणजे, २०२४ मध्ये सुरू झालेली विजयोत्सवाची परंपरा २०२५ या वर्षातील प्रत्येक निवडणुकीत अधिकाधिक उंचावली पाहिजे, हे ध्येय कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवून भाजपने महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या वाटचालीतील पहिले दमदार पाऊल शिर्डी येथे टाकले.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?

हेही वाचा : उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?

पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला ‘पंचायत ते पार्लमेंट’ हा कानमंत्र घेऊन कार्यकर्ते परतले आहेत. अगोदरच गलितगात्र होऊन परस्परांकडे पाठ फिरवत आपापला अस्तित्वाचा रस्ता शोधणाऱ्या विरोधकांना या मेळाव्याने दिलेले आव्हान म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आत्मविश्वासाचा नवा अध्याय ठरणार आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही, असा नारा विजयप्राप्तीनंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता पक्षाचा कार्यकर्तादेखील विजयाचे झेंडे उंचावल्याखेरीज थांबणार नाही असा विश्वास या महामेळाव्याने दिला. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या महाविजयामुळेच डळमळीत झाल्याचा दावा अमित शहा यांनी या मेळाव्यात केला. कदाचित यामुळेच शिडात फुटीचे वारे शिरलेले महाविकास आघाडीचे तारू दिशाहीन अवस्थेत भरकटत जात असावे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या फटक्याने त्याच वर्षातील लोकसभा निवडणुकांच्या विजयाच्या उन्मादाची नशा पुरती उतरवून टाकल्याने, महाविकास आघाडीसमोर २०२५ मध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान टिकविण्याचे आणि आगामी निवडणुकींचा सामना करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आपली क्षमता, संयमी नेतृत्वाचे गुण व रणनीतीच्या डावपेचांतील सारे वर्चस्व सिद्ध केलेल्या देवेंद्र फडणवीस या कसलेल्या सेनापतीशी आपला मुकाबला आहे, याची जाणीवही या आघाडीच्या नेत्यांच्या बदललेल्या सुरातून उमटू लागली आहे. शिर्डीच्या विजय मेळाव्यात अमित शहा यांनी शरद पवार यांच्या कथित जाणतेपणाचा बुरखाच उतरवला. निवडणुकीआधी विजयाची गणिते मांडून माध्यमांच्या शिकवण्या घेणाऱ्या पवार यांना वास्तवाचे भान देऊन जमिनीवर आणण्याचे काम करून अमित शहा यांनी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासात भर घातलीच, पण कार्यकर्त्यांच्या बळावरच असा विजय मिळू शकतो हा विश्वासही रुजविला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपप्रणीत महायुतीला आणि विशेषत: भारतीय जनता पक्षाला मतदारांनी दिलेला सत्तास्थापनेचा निर्विवाद कौल निर्भेळ यशाची स्थिती म्हणावी लागेल. या यशापर्यंत पोहोचण्याआधी राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जी आव्हाने पेलावी लागली, ती महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी क्वचितच कोणास पेलावी लागली असतील. भाजपने या निवडणुका विशेषत: लोकनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची साथ, भाजपचे केंद्रीय नेते असलेले गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा भरभक्कम पाठिंबा, निरपेक्ष कार्यकर्त्यांची प्रचारनीती आणि ‘राष्ट्र प्रथम’ ही पक्षाची राजनीती यांच्या आधारावर फडणवीस यांनी हे आव्हान पेलून ते परतविताना दाखविलेला संयम निश्चितच कौतुकास पात्र आहे.

हेही वाचा : तर्कतीर्थ विचार : जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व

विरोधकांच्या विखारी टीकेला, अमानुष शब्दप्रयोगांना फडणवीस यांनी कमालीच्या संयमाने तोंड दिले आणि आव्हानांच्या साऱ्या कसोट्या पार करून विधानसभा निवडणुकीत पक्षाला निर्भेळ यश मिळवून दिले. हा आनंद मोठा आहे, तो त्यामुळेच. विजयासोबतच्या नव्या जबाबदारीचे आव्हान पेलण्यासाठी ते सिद्ध झाले आहेत. पक्षाच्या विजयाचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उसळत असणार, हे स्पष्टच असल्याने, संयमित वातावरणात विजयोत्सव साजरा करण्याची कल्पनादेखील वाखाणण्यासारखीच ठरावी. साईनगरी शिर्डीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाने साजऱ्या केलेल्या महाविजय सोहळ्यात हेच चित्र दिसले. तो केवळ विजयोत्सव नव्हता. अगणित कार्यकर्त्यांची भावना तिथे केंद्रित झाल्या होत्या. नव्या जबाबदारीच्या जाणिवा तेथे सातत्याने उमटत होत्या. या जाणिवा रुजविण्याचे काम या मेळाव्यात पक्षाच्या प्रत्येक नेत्याने केले आणि ज्यांच्या शिरावर या जबाबदाऱ्या आहेत, त्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्याचा विनम्रपणे स्वीकारही केला.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयानंतरच्या मानसिकतेत असे दृश्य अभावानेच दिसते. अनेक राजकीय पक्ष विजयाच्या केवळ संकेतांनीदेखील हुरळून जातात. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची चिन्हेदेखील दिसत नव्हती, त्यामुळे सत्तेच्या संकेतांचे साधे वारेदेखील शिवले नव्हते. पण केवळ विजयी उमेदवारांचा आकडा वाढल्याचा अपार उन्माद त्या निकालानंतर या आघाडीच्या अनेक नेत्यांना लपविता आला नव्हता. पराभवाचाही जल्लोष केला जातो, हे त्या काळात अनुभवणाऱ्या जनतेने शिर्डी येथील भाजपच्या महाविजय मेळाव्यात साजऱ्या झालेल्या संयत विजयोत्सवाचा अनुभव घेताना याची तुलना नक्कीच केली असेल. लोकसभेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आणि देशातील इंडिया आघाडीच्या शिडात एवढे वारे शिरले की, त्याच्या प्रभावामुळेच कदाचित या आघाडीचे तारू पुढे कमालीचे भरकटले. आता तर ते दिशाहीन अवस्थेत किनारा शोधण्याची धडपड करताना दिसू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता थांबायचे नाही असा निर्धार करून, प्रत्येक विजय आपलाच असला पाहिजे, असा निर्धार करून नव्या जबाबदारीची तयारी सुरू करणे हे भाजपच्या विजयोत्सवाचे वेगळेपण ठरते.

हेही वाचा : लालकिल्ला : केजरीवाल रेवड्यांचे बादशहा; मग बिरबल कोण?

पाणीदार आणि ऊर्जावान महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पारदर्शी व प्रामाणिक वाटचालीचा संकल्प सोडून निघालेल्या या विजययात्रेमुळे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाला परिवर्तनाची नवी दिशा प्राप्त होईल, यात शंका नाही. हाच धागा पकडून संधीचे सोने करण्याचा काळ आला आहे. मायबाप जनतेने, पक्षाच्या दुर्लभ कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व यश आपल्या पदरात टाकले आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी ओळखून प्रत्येकाने तयारीला लागणे गरजेचे आहे.

आपण सारेच एक होऊ,

नवा, मजबूत, वैभवशाली महाराष्ट्र घडवू.

बदल जाओ वक्त के साथ,

या फिर वक्त बदलना सीखों,

मजबूरियों को मत कोसो,

हर हाल में चलना सीखो.

चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेशाध्यक्ष, भाजप

महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य

Story img Loader