संक्रांतीची तिथी बदलेल पण तारीख मात्र १४ जानेवारी हे समीकरण घट्ट बसलं आहे आपल्या मनात. पण संक्रांतीची तारीख बदलू शकते का? आणि वर्षात एवढी एकच संक्रांत असते का? यांची उत्तरं मिळाली की ‘काळाचे गणित’ समजणं सोपं जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मकर संक्रांत १४ तारखेला झाली. तिळगूळ देऊन-घेऊन झाला. आता समस्त स्त्रीवर्ग हळदीकुंकवाचे कार्यक्रम आणि त्यानिमित्त ‘दे-वाण’ ‘घे-वाण’ करण्यात मग्न असेल. संक्रांत ते रथसप्तमी यांदरम्यान हे हळदीकुंकू करावं असा संकेत आहे. रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी.
म्हणजे गंमत बघा. मकर संक्रांत आणि रथसप्तमी हे दोन्ही सण सूर्याशी संबंधित. पण मकर संक्रांतीची तिथी नक्की नाही आणि रथसप्तमीची तारीख!
बरं. १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करण्यापूर्वी साधारण महिनाभर सूर्यनारायण धनू राशीत होता. सूर्य धनू राशीत असतो त्या कालावधीला ‘धनुर्मास’ असं म्हणतात. त्याला ‘धुंधुरमास’, ‘झुंझुरमास’ असंही म्हणतात. या महिन्यात सकाळी लवकर भरपेट न्याहारी करावी असा प्रघात आहे. आरोग्यासाठी ते हितकर असतं असं म्हणतात.
हेही वाचा >>> बुकमार्क : ‘जोडी नंबर १’चे फसलेले आडाखे!
शालिवाहन शकाच्या वर्षाचे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, … असे बारा चांद्र महिने आहेत. पंचांगामधे याच बारा महिन्यांचा उल्लेख असतो. पण महिना सौर आणि तरीही पंचांगात उल्लेख हा मान फक्त धनुर्मासाचा. पंचांगात ‘धनुर्मासारंभ’ आणि ‘धनुर्मास समाप्ती’ अशी नोंद असते.
१४ जानेवारीला सूर्याचं मकर संक्रमण झालं. त्याने मकर राशीत प्रवेश केला. तसंच इतरही महिन्यांत १४/ १५ तारखेच्या आसपास तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. उदाहरणार्थ १२ फेब्रुवारीला तो कुंभ राशीत प्रवेश करेल आणि १४ मार्चला मीन राशीत. थोडक्यात, वर्षभरात सूर्याची एकूण १२ राशी-संक्रमणं होतात.
आता पुढचा मुद्दा. मकर संक्रांत आणि १४ जानेवारी यांचं अगदी घट्ट नातं आपल्या मनात असतं. (क्वचित कधी ती १५ तारखेलाही येते म्हणा.) पण हे नातं अगदी अलीकडचं आहे. कसं ते पाहू.
सन १८१८, पेशवाई अस्तंगत झाली ते वर्ष आणि सन १८५७, ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीयांनी उठाव केला ते वर्ष या दोन्ही वर्षी संक्रांत चक्क १२ जानेवारीला आली होती! सन १९०० या वर्षी संक्रांत १३ जानेवारीला आली होती. त्यानंतर काही अपवाद वगळता संक्रांत १४ जानेवारीलाच येऊ लागली. यात १९६४ पर्यंत काही बदल झाला नाही.
१९६४ साली प्रथमच संक्रांत १५ जानेवारीला आली. हे लीप वर्ष होतं. तिथून पुढे ‘लीप वर्ष असेल तर संक्रांत १५ जानेवारीला, एरवी ती १४ जानेवारीला’ हा क्रम सन २००६ पर्यंत चालू राहिला. थोडक्यात दर चार वर्षांनी एकदा संक्रांत १५ जानेवारीला येऊ लागली.
२००७ हे खरं तर लीप वर्ष नव्हतं. तरीही या वर्षी संक्रांत १५ जानेवारीला आली. पुढे २००८ साली, लीप वर्षी, ती १५ जानेवारीलाच आली. त्यानंतर मात्र ‘लीप वर्ष आणि त्याच्या आदलं वर्ष अशी दोन वर्षं संक्रांत १५ जानेवारीला आणि उरलेली दोन वर्षं संक्रांत १४ जानेवारीला’ असा क्रम चालू झाला. तो आजतागायत चालू आहे.
हे काय चाललं आहे? पेशवाईत १२ जानेवारीला येणारी संक्रांत आता दोन वर्षं १४ जानेवारीला आणि दोन वर्षं १५ जानेवारीला येऊ लागली! आता पुढे काय होणार?
फार दूर जायला नको. २०४६, २०४७ (भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव) आणि २०४८ अशी सलग तीन वर्षं ती १५ जानेवारीला येईल. आणि त्यानंतर ‘लीप वर्षानंतरच्या वर्षी संक्रांत १४ जानेवारीला, बाकी सर्व वर्षी संक्रांत १५ जानेवारीला’ हा क्रम चालू होईल.
मात्र १४ जानेवारीला संक्रांत असं २०८१ साली घडेल ते शेवटचं. त्यानंतर कधीही संक्रांत १४ जानेवारीला येणार नाही. हा संस्मरणीय प्रसंग वाचकांपैकी काही जण तरी अनुभवू शकतील. तुमच्या कॅलेंडरमध्ये या दिवसाची नोंद आजच करून ठेवा!
आता दोन प्रश्न निर्माण झाले. कोणे एके काळी संक्रांत डिसेंबर महिन्यात यायची का? आणि भविष्यात कधी तरी ती फेब्रुवारी महिन्यात येईल का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत.
ते कसं हेदेखील आपण पाहणार आहोत, यथावकाश.
‘संक्रांतीची तिथी’ (११ जानेवारी) या लेखासोबतची आकृती क्रांतिवृत्तावर
१३ राशी दाखवणारी होती. प्रत्यक्षात क्रांतिवृत्तावर १२ च राशी असतात.
मजकुरातही तसाच उल्लेख आहे.
@KalacheGanit
kalache.ganit@gmail.com