संविधानाचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने फेब्रुवारी २००० मध्ये संविधानाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन केला. ११ सदस्य असलेल्या या आयोगाचे अध्यक्ष होते सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एम. एन. वेंकटचलय्या. या आयोगाने २००२ साली दीर्घ अहवाल सादर केला. १९५० ते २००० या काळातील कामगिरीचा आढावा घेताना मुख्य ११ बाबींविषयी अभ्यास करण्याचा उद्देश आयोगाने स्पष्ट केला होता: (१) संसदीय लोकशाहीसाठी संस्थांना बळकटी देण्याचा प्रयत्न. (२) निवडणूक सुधारणा. (३) मूलभूत हक्कांमध्ये बदल. (४) राज्यसंस्थेसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी. (५) मूलभूत कर्तव्यांची परिणामकारकता. (६) केंद्र-राज्य संबंधांमध्ये सुधारणा. (७) पंचायत राज व्यवस्थेतून झालेले विकेंद्रीकरण. (८) समाज आर्थिक बदलाचा आणि संविधानाच्या अंतर्गत विकासाचा वेग. (९) साक्षरता वाढ, रोजगार निर्मिती, सामाजिक सुरक्षा वाढ, गरिबी निर्मूलन. (१०) वित्तीय आणि आर्थिक कायद्यांचे नियंत्रण. सार्वजनिक लेखापरीक्षण यंत्रणा. (११) प्रशासकीय व्यवस्था आणि सार्वजनिक जीवनाचा दर्जा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा