नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराज येथे जाण्यासाठी असणाऱ्या गाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे भाविक महाकुंभात पुण्य कमविण्यासाठी चालले होते, पण त्यांना मात्र मृत्यू मिळाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना शोक! असे विशिष्ट संगमावर आणि विशिष्ट दिवशी डुबकी मारून पुण्य मिळते हा पसरवलेला भ्रम किंवा अंधश्रद्धा या बळींना कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. भीषण गर्दीत गाडीत चढण्याचा आटापिटा आणि गाडीत चढल्यानंतर होणारा त्रास याचा कोणताच विचार न करता आंधळेपणाने अशा ठिकाणी जाण्याचे धैर्य लोक दाखवतात हेच मुळात मूर्खपणाचे लक्षण आहे. रेल्वे डब्यांची प्रवासी क्षमता आणि देण्यात येणारी तिकिटे यांचाही विचार यानिमित्ताने करावा लागेल आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक येणार म्हणजे त्याप्रमाणे रेल्वेने नियोजन करायला पाहिजे होते. पण अशा ‘विशेष’ गाडीच्या गर्दीचे नियोजन हा शब्दच मुळी रेल्वेच्या शब्दकोशात नसावा. विशेष गाडी सोडली यातच त्यांची इतिकर्तव्यता!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा