कामगार नेते जार्ज फर्नाडिस यांच्या पुढाकाराने ५७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मुंबईस्थित न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध हजारो गुंतवणूकदार व ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. तब्बल ३५ वर्षांपूर्वी शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळालेल्या या बँकेची आर्थिक स्थिती गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने ढासळत होती. त्यातून मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली. मात्र प्रामुख्याने सहकारी बँकांची अशी अवस्था का होते? त्याला जबाबदार कोण? व्यवस्थापन मंडळ की यावर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणा? यासारखे अनेक प्रश्न पुन्हा एकदा उभे ठाकले आहेत. सहकार कायद्यांन्वये स्थापन झालेल्या बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कार्यरत असतात. त्यांच्या वित्तीय व्यवहाराचे वेळोवेळी परीक्षण व अंकेक्षण होत असते. तरीही त्या डबघाईला येत असतील तर यंत्रणेतला भुसभुशीतपणा समोर येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा