‘सीतारामन ‘सिंग’ होतील?’ हा अग्रलेख (२८ जानेवारी) वाचला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्राोतांमधून गुंतवणूक व यातून पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध उद्याोगांना मिळणारी बळकटी या जमेच्या बाजू असल्या तरी या वाढीला अनेक विरोधाभास आहेत. पहिला विरोधाभास गुंतवणुकीचा ओघ असूनही डॉलरच्या तुलनेत रुपयाची जबरदस्त घसरण झालेली दिसते. रुपयाच्या अवमूल्यनास चलनवाढ आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यासह इतर घटक कारणीभूत असू शकतात. दुसरा विरोधाभास गुंतवणुकीचे दृश्य परिणाम स्पष्टपणे नजरेत भरत नाहीत. विकास आणि प्रगती होत असली तरी त्यांच्या लाभांचे वितरण समान होत नाही परिणामी आर्थिक व सामाजिक विषमता कायम राहते. हे एक प्रमुख कारण आहे की फार मोठ्या लोकसंख्येला उदरनिर्वाहासाठी सरकारवर अवलंबून राहावे लागते. तिसरा विरोधाभास बेरोजगारीचा. ही एक फार गंभीर समस्या आहे. आर्थिक गुंतवणूक, विकास व प्रगतीबरोबर रोजगारनिर्मिती व्हायला हवी पण रोजगाराच्या संधी त्या प्रमाणात उपलब्ध न झाल्याने रोजगाराचा अभाव जाणवतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा