एके काळी हॉलीवूडमधील गौरवर्णीयांचा सोहळा असे स्वरूप असलेला आणि पुरस्कारांवर जगभरातील गौरवर्णीयांचीच मक्तेदारी दिसणारा चित्रपट जगतातील परमोच्च ‘ऑस्कर’ पुरस्कार गेल्या दशकभरापासून सर्वार्थाने जागतिक होत असल्याच्या खुणा दरवर्षी ठळक होत चालल्या आहेत. २०२० साली बाँग जुन हो या कोरियन दिग्दर्शकाच्या ‘पॅरासाइट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटावर आपले नाव गोंदवले. त्याआधीच्या काही वर्षांपासूनच भव्य-दिव्य सिनेमांची आणि नामांकित चित्रकर्त्यांची पुरस्कार लढत ही केवळ तांत्रिक विभागातील ऑस्कर बाहुल्या पटकावण्यासाठी राहिलेली आहे. वीसेक वर्षांपूर्वी ‘इण्डिपेण्डण्ट’ चित्रकर्त्यांना सीमारेषेवर ठेवणाऱ्या अकादमीची, या बाहेरच्यांनाही आतमध्ये सामावून घेण्याची बदललेली मानसिकता यंदा ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स’ने  सात पुरस्कार पटकावण्यातून दिसून येते.

एकीकडे स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरॉन हे चित्रसमुद्रातील मोठे मासे आपल्या सर्वोत्तम कलाकृतींना घेऊन जिंकण्याच्या असोशीने उतरलेले असताना या आणि इतर दिग्गजांवर मात करीत डॅनियल्स या दिग्दर्शकद्वयीने गोष्ट सांगण्याच्या दृश्यकलेतील श्रेष्ठत्व सिद्ध केले. यातल्या डॅनियल क्वान यांची वंशमुळे चीनमधली, तर डॅनियल शाईनर्ट यांची दक्षिण अमेरिकेतली. सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी मिशेल यो मलेशियातली आणि हाँगकाँगच्या देमार सिनेमांतून घडलेली. सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारा के हुए क्वान हा व्हिएतनामी -अमेरिकी. या चित्रपटातील एक कलाकार कोस्टारिकामध्ये जन्मलेला तर एक अभिनेत्री भारतीय वंशाची अमेरिकी सुनीता मणी. या बहुविध मुळांच्या व्यक्तिरेखांना अनेक समांतरविश्वात फिरवून कुठल्याही एक प्रकारचे मनोरंजन न देता अनेक अनुभवांचे कडबोळे देणाऱ्या या चित्रपटाला पारितोषिक मिळते, तेव्हा ‘गौरवर्णीयांचा सोहळा’ ही ऑस्करची फार पूर्वी तयार झालेली छबी पार बदलून जाते. अमेरिकी जनांची ‘ऑस्कर नाइट’ म्हणजे भारतीयांची साखरझोपेची पहाट. दरवर्षी पुरस्कारांच्या गटात एखादे भारतीय नाव फार फार तर बाद होण्यासाठीच सहभागी होण्याची परंपरा फार पूर्वीची. तरीही ‘ऑस्कर पहाट’ ही सिनेवेडय़ा भारतीयांसाठी महत्त्वाची होत गेली, ती २००५ नंतर आलेल्या ‘डीव्हीडी बूम’मुळे. ऑस्करचे मानांकित चित्रपट पुरस्कारांच्या आधी अगदी थोडे आणि नंतर काही असा सारा मामला या डीव्हीडी प्रसारानंतर बदलला.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

‘ऑस्कर कन्सिडरेशन’साठी पाठविल्या जाणाऱ्या प्रती पायरसी उद्योगाने जगभरात प्रसारित केल्या आणि हे चित्रपट जनसामान्यांपर्यंत जाऊ शकले. त्यामुळे रिचर्ड अ‍ॅटनबरो ते डॅनी बॉयल या परदेशी निर्माते, परदेशी दिग्दर्शकांच्या ऑस्कर पटकावणाऱ्या सिनेमांना अस्सल भारतीय समजून जल्लोष, अभिमानाच्या पताका इथे भरपूर लागल्या. ‘स्लमडॉग मिल्यनेअर’ या ब्रिटिश चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारानंतर ‘जय हो’चा उन्मादआनंद राजकारणापासून ते सर्वच क्षेत्रात पसरला.. तो जणू भारतालाच मिळाला असल्याच्या थाटात. ऑस्करसाठी भारताकडून  अधिकृत पाठविल्या गेलेल्या सिनेमाऐवजी निर्माते-दिग्दर्शकांनी आपल्या बळावर पाठविलेला तेलुगू चित्रपट बाहेरून स्पर्धेत उतरून अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट गीताचा महत्त्वाचा पुरस्कार मिळवतो, हे आश्चर्यकारक आहे. एरिक मरिआ रेमार्क यांच्या ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रण्ट’ या १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या युद्धविरोधी कादंबरीवर अमेरिकी स्टुडिओंनी तातडीने १९३० साली चित्रपट बनविला होता. कादंबरीची आणखीही रूपांतरे झाली, पण पहिल्या महायुद्धाचे चित्रण जर्मन सैनिकांच्या दृष्टिकोनातून करणाऱ्या २०२२ सालचे जर्मनीचे रूपांतर सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपटाच्या गटासह पार्श्वसंगीतातही अमेरिकी दिग्गज पंडितांना बाद ठरवते, असे पहिल्यांदा पाहायला मिळाले.

रिहाना, लेडी गागा या जागतिक ओळख असलेल्या गायिकांच्या तुलनेत ‘नाटू नाटू‘ हे गाणे गाणारे दोन दक्षिण भारतीय गायक आपल्या देशातही अद्याप अपरिचितच. पण त्यांची अपरिचितता गाण्याला जराही बाधा आणणारी ठरली नाही. ‘आरआरआर’ ला पुरस्कार मिळावा, त्या पुरस्कारामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा आणि मी यशाच्या अत्युच्च शिखरावर असावे अशी माझी आणि चित्रपटकर्ते एस. एस. राजमौळी यांची तीव्र इच्छा होती.’ हे कार्पेन्टर्स या अमेरिकी बॅण्डच्या ‘ऑन द टॉप ऑफ द वल्र्ड’ या गाण्याच्या सुरावटीच्या साथीने पुरस्कार घेताना एम.एम किरवानी अर्थात एम.एम. करीम यांनी सांगितले. ‘‘कार्पेन्टर्स’ची गाणी ऐकत वाढलो’ हे कार्पेन्टर्सच्या देशात सुनावणारा एका बाहेरच्या देशातला कलाकार ऑस्कर सोहळय़ात आतला कसा होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण. लघुपटांच्या विभागातही कार्तिकी गोन्साल्विस यांच्या ‘एलिफंट व्हिस्पर्स’ला पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा झाला. हे असे ‘बाहेरच्यांचे आतलेपण’ पुढील सोहळय़ांत वाढत जाणार याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे.

Story img Loader