समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. हे साध्य करण्यात मुख्यमंत्र्यांचं मोलाचं योगदान आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य
‘कुंकू’ या गाजलेल्या चित्रपटातलं एक गाणं सर्वाना माहीत असणार. ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची..’ याच गाण्यात एक कडवं आहे. झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला काटंकुटं वाटंमंदी बोचति त्याला रगत निगंल, तरि बि हसंल, शाबास त्येची.. या गाण्यामध्ये भल्याचा झेंडा घेऊन निघाल्याचा उल्लेख आहे. असा भल्याचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेल्यांचा प्रवास सोपा नसतो. त्यांच्या वाटेत काटे असतात, खाचखळगे असतात. पण तरीही भल्याचा झेंडा खांद्यावर घेतलेल्यांना त्याची पर्वा नसते. हा असाच झेंडा खांद्यावर घेऊन निघालेलं व्यक्तिमत्त्व आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. त्यांच्या खांद्यावरील झेंडा आहे तो महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या भल्याचा. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या विकासात मोलाची भर घालण्याची ताकद असलेल्या समृद्धी महामार्गाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली तेव्हा त्यांनी ती एक आव्हान म्हणून स्वीकारली. फक्त स्वीकारली नाही, तर ती यशस्वीरीत्या पार पाडून दाखवली.
या महाकाय प्रकल्पातलं सगळय़ात पहिलं आव्हान होतं ते भूसंपादनाचं. एक-दोन नव्हे, तर १० जिल्ह्यांमधून तब्बल आठ हजार ८६१ हेक्टर भू-संपादन करायचं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी हे अत्यंत अवघड काम अवघ्या १८ महिन्यांत पूर्ण केलं. शेतकऱ्यांनी आनंदानं या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या. त्याची बूज राखून सरकारनं त्यासाठी योग्य मोबदलाही दिला.
या प्रकल्पाची आखणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा नुकताच खुला झाला. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा आहे. त्याचं महत्त्व जाणण्यासाठी, थोडे संदर्भ पाहू या. लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं, तर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचं राज्य. मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचं योगदान सर्वाधिक आहे. भारताला पाच ट्रिलिअनची अर्थव्यवस्था बनवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्रावर मोठी जबाबदारी येऊन पडते आणि त्याच दृष्टीने हा महामार्ग अतिशय कळीचा व मोलाचा ठरणार आहे. या महामार्गाची वैशिष्टय़ं एकदा पाहू या..
ठाणे जिल्ह्यातील आमने गाव ते नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गाव अशी जोडणी करणारा हा महामार्ग तब्बल ७०१ किलोमीटर लांबीचा आणि सहापदरी आहे. डोंगराळ भागात ताशी १२० किलोमीटर तर इतरत्र ताशी १५० किलोमीटर इतका वाहनवेग प्रस्तावित आहे.
महाप्रचंड महामार्ग..
तब्बल ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, रेल्वे मार्गावरील आठ उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, सहा बोगदे, १८९ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भुयारी मार्ग, तीन उन्नत मार्ग, व्हाया डक्ट/ उड्डाणपुलांची संख्या ६५, ६७२ ठिकाणी कल्व्हर्ट, २१ ठिकाणी वे-साइड अॅमिनिटीज आहेत.
महामार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विनामूल्य दूरध्वनी सेवाही पुरवण्यात आली आहे. इतका मोठा महामार्ग असेल तर तो जंगलांतून, रानावनांतून जाणारच. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना निसर्गाचा भरभरून आनंद लुटता येईल. पण त्यामुळे वन्यजीवांच्या मार्गात कुठलीही बाधा येऊ नये, त्यांना कुठलाही धोका उद्भवू नये, यासाठी तीन ठिकाणी वन्यजीवांसाठी खास भुयारी मार्ग तयार केले आहेत.
महामार्गावर दर ४० ते ५० किलोमीटरवर दोन्ही बाजूंना वे-साइड अॅमेनिटीजची उभारणी करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधा मिळतील. विजेवरील वाहनं ही आजची व भविष्याची गरज असल्याने त्यास प्रोत्साहन देण्याचं आपलं धोरण आहे व तशा वाहनांची संख्याही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावर या वाहनांसाठी चार्जिग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. महामार्गावरील पथकर संकलन, तसेच वाहतूक प्रणाली अद्ययावत असावी यासाठी ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा चपखल वापर आहे.
विकासाचा झंझावात
रस्ते, पूल, बोगदे, मेट्रो, विमानतळ, इमारती ही सगळी विकासाची साधनं. विकास कसा हवा? तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा. समृद्धी महामार्गाची आखणी, उभारणी करताना हे सूत्र डोळय़ांसमोर ठेवण्यात आलं.
वेगे वेगे जाऊ..
महामार्गाचा अगदी मूलभूत फायदा म्हणजे वेगवान प्रवास. या महामार्गामुळे मुंबई ते औरंगाबाद हे अंतर चार तासांत व औरंगाबाद- नागपूर चार तासांत कापता येईल. प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होईल. येत्या काळात समृद्धीचा विस्तार गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे. यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा आदी शेजारी राज्यांपर्यंतचा प्रवासही वेगवान आणि सुकर होईल.
समतोल विकासाचा महामार्ग
संपूर्ण राज्याचा विकास घडवायचा तर काही मोजकी शहरं, काही मोजके टापू ही विकासाची बेटं व इतर ठिकाणी विकासाचा अनुशेष असं असून चालत नाही. त्या दृष्टीने पाहता हा समतोल विकास घडवणारा महामार्ग आहे. महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जातील. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी तब्बल २४ जिल्ह्यांसाठी समृद्धीची वाट खुली होईल. त्यातही, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ मिळेल.
नेमका लाभ काय?
समृद्धी महामार्गामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, बेंगळूरु- चेन्नई इकॉनॉमिकल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तसेच चेन्नई विझाग (वायझ्ॉग) इकॉनॉमिक कॉरिडॉर असे महत्त्वाचे मार्ग या कॉरिडॉर जोडले जाणार आहेत. हे सर्व कॉरिडॉर जेएनपीटीशी थेट जोडले जातील. त्यामुळे राज्याच्या निर्यात व्यापारास चालना मिळेल. समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मालवाहतुकीला होईल. वर्धा आणि जालना येथील ड्राय पोर्ट लवकरच प्रत्यक्षात येतील. त्या माध्यमातून शेतमाल जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांना सहजशक्य होईल.
रोजगाराची संधी
महामार्गानजीक १९ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवनगरांची उभारणी करण्यात येणार आहे. तेथील कृषी आधारित उद्योगसंधींमुळे स्वयंरोजगार आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागात बिगरशेती आधारित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कृषी प्रक्रिया प्रकल्प, शीतगृहं, गोदामं, लॉजिस्टिक्स, पशुवैद्यकीय दवाखाने आणि कृषी उत्पादनांशी संबंधित व्यवसायांतून प्रगतीची नवी कवाडं खुली होतील.
कौशल्य विकास उपक्रम
कृषी केंद्रांमध्ये कृषी आधारित उद्योग, शीतगृहं (कोल्ड स्टोरेज), गोदामं, खाद्य प्रक्रिया उद्योग तसंच औद्योगिक व निवासी क्षेत्रांचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ समृद्धी महामार्गालगतच्या परिसरातच उपलब्ध व्हावं, यासाठी स्थानिकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण महामंडळातर्फे देण्यात आलं आहे. ज्या जमीन मालकांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन भविष्यासाठी रोजगारक्षम करणं, हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. महामार्गामुळे प्रत्येक कृषी समृद्धी नगरात २० ते २५ हजार लोकांना रोजगार मिळेल.
पर्यटनाला चालना
समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्रांतर्गत आणि बाहेरील पर्यटकांना काही तासांत विविधांगी महाराष्ट्राचा समृद्ध ठेवा अनुभवता येईल. लोणार सरोवर, वेरुळ-अजिंठा लेणी, दौलताबादचा किल्ला, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, बीबी का मकबरा इत्यादी पर्यटनस्थळी जाणं त्यायोगे सोपं होईल. महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे त्याचं मोठं श्रेय एकनाथ शिंदे यांचं. आणि केवळ समृद्धी महामार्गच नव्हे; मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मिसिंग लिंक, रिंग रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोस्टल रोड या आणि अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा हा ‘इन्फ्रामॅन’ राज्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी झटतो आहे. राज्याच्या भल्याचा, विकासाचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला आहे. तो असाच डौलानं फडकत राहील, अधिकाधिक उंची गाठत जाईल, यात तिळमात्र शंका नाही.