‘व्हेनिस बिएनाले’मध्ये यंदा भारताचं ‘नॅशनल पॅव्हिलियन’ नाही, असं सांगितलं काय किंवा ‘ व्हेनिस शहरात दर दोन वर्षांनी भरणाऱ्या चित्र/शिल्पकला महाप्रदर्शनाची ६० वी खेप येत्या एप्रिलमध्ये सुरू होईल आणि नोव्हेंबपर्यंत सुरू राहील, त्यामध्ये भारताचा ‘राष्ट्रीय कलामंडपा’द्वारे सहभाग असणार नाही’ अशा सविस्तर मराठी शब्दांत सांगितलं काय, यात बातमी आहे हे फार कुणाला कळणारच नाही.. मुळात तिथं भारताचा सहभाग ‘सत्तर साल में’ कधी म्हणजे कधीही नव्हता! सन २०१४ नंतर जो काही ‘नवा भारत’ घडला, त्या भारताच्या राष्ट्रीय कलामंडपाचा सहभाग मात्र २०१९ च्या व्हेनिस द्वैवार्षिक महाप्रदर्शनात होता आणि त्या वेळी मात्र ‘व्हेनिसमध्ये भारताचा बोलबाला’, ‘आता दर खेपेला असणार व्हेनिसमध्ये भारताचा राष्ट्रीय कलामंडप’ अशा प्रकारची प्रसिद्धी करण्यात आलेली होती. मग करोनामुळे २०२१ सालची व्हेनिस बिएनालेच वर्षभर पुढे ढकलण्यात आली, तेव्हा भारतानं नकार कळवला होता. मात्र ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘इंडिया आर्ट फेअर’च्या संकेतस्थळावर, ‘भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे २०२४ च्या एप्रिलमध्ये होणाऱ्या व्हेनिस बिएनालेमध्ये भारताचा राष्ट्रीय कलामंडप उभारण्यासाठी गुंफणकाराची (प्रदर्शन नियोजकाची) नेमणूक करणे आहे’ अशा प्रकारच्या सूचना दिसू लागल्या. त्यामुळे यंदा भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तथाकथित स्वायत्त कला-संस्थांनी हात दाखवून अवलक्षण केलंय.. किंवा कुणाच्यातरी नाकर्तेपणामुळे ते त्यांना करावं लागलंय, हे उघड आहे. पण म्हणून काय भारत वंचित राहिलाय का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा