क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी सर्वात पहिली अट म्हणजे तंदुरुस्ती. विविध क्रीडा प्रकारांत भारताचे आणि भारतीय सैन्यदलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना ही अट पूर्ण करण्यासाठी चार दशकांहून अधिक काळ मार्गदर्शन करणारे लेफ्टनंट जनरल सुसाईनाथन अँथनी क्रूझ (एस. ए. क्रूझ) यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील घोरपडी येथील सैन्यदलांच्या ‘स्पोर्ट्स मेडिकल सेंटर’साठी क्रीडा क्षेत्राशी संबंधित वैद्यकीय अभ्यास करणारी आणि खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशाच स्वरूपाच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी त्यांनी ‘स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ला साहाय्य आणि मार्गदर्शनही केले.

पुण्यातच, ‘सेंट व्हिन्सेन्ट स्कूल’ आणि ‘वाडिया कॉलेज’मध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या क्रूझ यांनी ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’मधून १९७४ साली वैद्यकीय पदवी संपादन केली. ते त्या वर्षीचे सुवर्णपदक विजेते ठरले. त्यांनी एकाच वर्षांत सर्वोत्तम क्रीडापटूसाठीचा ‘कृष्णमेनन चषक’ आणि हॉकी, फुटबॉल व अ‍ॅथलेटिक्समध्ये पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दलचे सुवर्णपदक अशा दोन सन्मानांवर स्वत:चे नाव कोरले. सैन्यदलांच्या राष्ट्रीय हॉकी संघाचे ते गोलरक्षक होते.

Odisha Subhadra Scheme News
Odisha : ओदिशातली सुभद्रा योजना नेमकी काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढदिवशी योजनेचा शुभारंभ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Appointment of IITs to maintain good quality of roads Mumbai news
रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी आयआयटीची नेमणूक – मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार
government lanched ladki bahin yojana but woman not appointed in commitee set up to implement scheme
नागपूर : लाडक्या बहिणींच्या समितीवर सर्वच भाऊ
Digital Revolution in Indian Agriculture
विश्लेषण : कृषी क्षेत्रातही होणार डिजिटल क्रांती? काय आहेत केंद्र सरकारच्या योजना?
Badlapur incident, seven-member committee,
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Navi Mumbai schools CCTV, Sakhi Savitri Committee,
नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

१९८३ ते १९८५ या कालावधीत त्यांना केंद्र सरकारतर्फे ‘स्पोर्ट्स मेडिकल सेंटर’ स्थापण्यासाठी, जर्मनीच्या हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीत क्रीडा वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तेहरानमध्ये १९७४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि १८७४ मध्ये झालेल्या माँट्रियल ऑलिम्पिक्समध्ये ते सहभागी झाले. १९७७ साली कांचनजुंगा आणि १९८० साली नंदा देवी गिर्यारोहण मोहिमेत ते सहभागी झाले. ९०च्या दशकात ते भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाचे डॉक्टर होते. सशस्त्र दले आणि भारतीय क्रीडा संघांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाठबळ देण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांचे प्रशिक्षण साहाय्य लाभलेल्या २७५ पेक्षा अधिक क्रीडापटूंनी अ‍ॅथलेटिक्स, मॅरेथॉन, नेमबाजी, धनुर्विद्या आणि रोिवग अशा विविध क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके प्राप्त केली.

दुखापती रोखण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी त्यांनी सातत्यपूर्ण आणि शास्त्रशुद्ध प्रयत्न केले. खेळाडूंबरोबर प्रत्यक्ष मैदानात सदैव सज्ज असलेले उत्साही डॉक्टर म्हणून ते ओळखले जात. नेहमीच ट्रॅकपँट घालून खेळाडूंना प्रशिक्षण आणि सल्ला देण्यात, त्यांच्याबरोबर कित्येक किलोमीटरचे अंतर सायकलवरून किंवा धावत पार करण्यात ते मग्न झालेले दिसत. त्यांनी दिलेल्या सूचना लष्करातील जवानांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपर्यंत अनेकांना अतिशय उपयुक्त ठरल्या. त्यांच्या या सूचनांच्या आधारेच जवानांसाठी शारीरिक शिक्षणाचे यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले. क्रीडा विज्ञान क्षेत्राच्या विकासासाठी त्यांची नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. याव्यतिरिक्त देशातील क्रीडा क्षेत्राचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या ‘नरसिंह राव समिती’चेही ते सदस्य होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘शिव छत्रपती पुरस्कार’ देऊन गौरविले. ‘सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’नेही ‘क्रीडा भूषण पुरस्कारा’ने त्यांचा सन्मान केला. क्रीडा विज्ञान, तंदुरुस्ती आणि वैद्यकीय अशा तीन क्षेत्रांसाठी त्यांचे कार्य पथदर्शी ठरले.