प्रदीप रावत

वेगवेगळ्या जीवांच्या परस्पर आश्रयातून, सहजीवनातून पृथ्वीवरील जीवप्रकारांमध्ये कमालीचे वैविध्य अवतरले. हे फक्त मनुष्य आणि प्राण्यांमध्येच नाही तर वनस्पतींमध्येही घडले आहे.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

जनुके तगण्यासाठी अनेक मार्ग आणि उपाय अवलंबतात. तगण्यासाठी आपसात स्पर्धा करतात हे तर उघडच आहे. परंतु तगण्याचा सोयीस्कर उपाय म्हणून अन्य जीवांच्या जनुकांचा मैत्रीपूर्ण आधार घेतात. उत्क्रांतीच्या वाहत्या समुद्रामध्ये काही उलथापालथ करणारे खळबळजनक प्रवाह आहेत. तगण्याच्या सोयीपोटी स्पर्धेच्या जोडीनेच परस्परांना लाभकारक आघाडी उभारणे हा एक स्वाभाविक ‘बनाव’ आहे. अनेक जीवन जनुके तो अवलंबताना आढळतात. परस्परांना लाभणारी अनुकंप वृत्ती किंवा अनुजीवीपण (सिम्बायोसिस) आणि सहकार (को-ऑपरेशन) या दोहोंचे भरपूर मासले उत्क्रांतीच्या प्रवाहात आढळतात. या परस्परांना एकाच वेळी लाभकारक असणे हा त्याचा गाभा आहे. त्याखेरीज अनुकंपा उपजत नाही. सहकारी हालचाल घडत नाही. अनुकंपा म्हणजे करुणा आणि एकतर्फी सद्भावना नव्हे!

याची एक मोठी प्रगल्भ वानगी म्हणजे काही जीवांमध्ये डोळय़ात भरणारे सहजीवन आणि सहवर्तन! उंबर फुलाचे रूप मोठे फसवे आहे. ज्याला आपण फळ समजतो तो खरेतर फळासारखा भासणारा पुष्पगुच्छ असतो. फळाचा मुख्य भाग म्हणजे पुनरुत्पादनासाठी लागणारे बीज! ते फुलात तयार होण्यासाठी परागीभवन झाले पाहिजे. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची माशीच कामी येते. कोकिळेने कावळय़ाच्या घरटय़ामध्ये अंडी घालण्याचे तर काक-कोकील न्याय असे भारदस्त बारसे झाले आहे. परोपजीवी ऊर्फ बांडगुळे फक्त वनस्पतीत नसतात. आपल्या शरीरात वाढणारे अनेक परोपजीवी जीवाणू आहेत. त्यातले काही तर फार परोपकारी म्हणजे आपल्याला उपकारक आहेत! म्हशींच्या पाठीवर ऐटीत बागडणारे बगळे, शार्कच्या सपाट भालीकपाळी मुक्काम करणारे छोटे मासे, असे भाराभर नमुने सांगता येतील. त्यातदेखील परस्परपूरक आणि यजमान-आश्रित ( इंग्रजीत म्युच्युअल आणि कामनसाल) असे पोटभेद आहेतच.

पण या परस्परआश्रयाची पराकाष्ठा म्हणजे पाळीवपणा! त्यात नुसती परस्परपूरकता नाही तर गाढ अनुजीवीपण आहे. ‘मनुष्यप्राणी’ आणि शेलके ‘अन्य प्राणी’ तसेच मूठभर वनस्पती यांमध्ये जे गाढ अनुजीवीपण उत्क्रांत झाले ते भलतेच लक्षणीय आहे. या जैविक युतींमुळे पृथ्वीवरील अनेक भूभागांचा चेहरामोहरा पालटला. अनेक नवे जीवजातीप्रकार उपजले तसेच अनेक अगोदरच्या जाती प्रकारांची झपाटय़ाने पिछेहाट झाली. हे निसर्गक्रमी बदल आजवर अव्याहत चालूच आहेत. अनेक जीवप्रकारांच्या लोकसंख्यांचे संख्यात्मक वाढणे आणि आकसणे बदलले. काहींचा अनोळखी प्रद्रेशात भौगोलिक प्रसार बळावला तर काहींची स्थानिक लोकसंख्यादेखील ओसरली. जीवप्रकारांमध्ये काही नवीनांची भर पडली तर काही भलतेच दुर्मीळ होऊन बसले.

थोडक्यात जीवप्रकारांचे परस्पर प्रमाण कल्पनातीत बदलले. त्याच्या वैविध्याची ठेवण पालटली. विशेषकरून मनुष्यप्राणी आणि त्याच्याशी पाळीव दोस्ती जमू शकणारे जीवप्रकार प्रमाणाने बळावले इतर खालावले. सहजी लक्षात येण्यासारखे उदाहरण बघू. अगोदर जमिनीवर वाढणारी किती तरी गवते होती. मनुष्यप्राण्याच्या  हुशारीने त्याला उपयोगी धान्यदार गवतांची पुन:पुन्हा दाणे पेरकाचे आणि विपुल लागवड करण्याचे तंत्र विकसले. तांदूळ वा गहू देणाऱ्या पोएसी आणि ग्रामिनी कुळातल्या वेचक गवतांचा झपाटा वाढला. इतर गवते संख्येने आकसली. याला म्हणतात शेतीचा शोध! या ‘गवतां’ना ‘माणूस प्राण्या’मुळे आपल्या वंशाचा विस्तार सहजी फोफावता आला. माणूस प्राण्याचाही वंश धान्याच्या लयलुटीने बळावला. पाळीव प्राण्याची प्रजा फोफावली. कुत्रे, बैल, डुक्कर, बदके, कोंबडय़ा संख्येने उदंडले! गवते वृक्षवेलींना निवडक पाळीवपण लाभले आणि इतर वनस्पतींचा वरचष्मा ढेपाळला. हा तर असल्या पाळीव गवतांचा झाडांचा प्राण्यांचा अप्पलपोटा स्वार्थी वांशिक साम्राज्यवाद! तोही माणसाला हाती धरून केलेला! तात्पर्य जीवो जीवस्य जीवनम् इतकेच जीवो जीवस्य प्रसारणम् हे पण तेवढेच खरे!

हे पाळीव उप-आख्यान उत्क्रांती नामक महाकाव्यात कधी आणि कसे उपजले? त्याचा इतिहास उलगडणे तितके सोपे नाही. पहिली अडचण आहे पुराव्यांची. या प्रक्रियेत जे घडले त्याची भूमीत गाडलेली नोंदवही जेवढे सांगते ते स्वभावत: त्रोटक असतेच. प्राण्यांचे त्यांच्या हाडांमुळे विपुल सांगाडे मिळतात. वनस्पतींचे काय उरणार? फक्त अपघातवशाने त्यांचे क्वचित अश्मरूप मिळतात. क्वचित खोडांचे लाकडी मोठे ढलपे वा तुकडे. प्राणी असोत वा वनस्पती, त्यांना पाळीवपण लाभण्याअगोदरची मूळ रानटी आवृत्त्या कोठे कोठे तग धरून असते. त्यांच्या आधाराने बहुतेक इतिहास उभारला आणि जोखला जातो.

जगभरात सर्वत्र सर्व प्रकारचे प्राणी नव्हते. पूर्वीही नव्हते आजही नाहीत. अगोदर कुठे होते? नंतर का आणि कधी पसरले? त्यांची अशी स्थलांतरे घडविणारी कारणे कोणती? याचाही काही अंशी वेध घेता येतो. पृथ्वीवरील भूगर्भाच्या काही उलथापालथी अतिप्राचीन आहेत तर काही तुलनेने अलीकडच्या आहेत. उदाहरणार्थ भूगर्भी उलथापालथीमुळे अनेक वाळवंटे उद्भवली! तेथील काही प्राणी, झाडझाडोरा नष्ट पावले तर काही स्थलांतरित झाले. नद्यांचे बदलते पात्र, सागरी महासागरी पाण्याची पातकी उंचावणे किंवा ओसरणे. अशा उलथापालथींमुळे जगभरचे हवामान फार हेलकावत आले आहे. त्यामुळे जीवसृष्टीचे भौगोलिक विखुरणे, पसरणे, एका जागी दाटून येणे असे स्थलांतर सतत होत आले आहे. अशा स्थलांतराच्या रेटय़ामुळे ज्यांना बदलत्या वातावरण आणि पर्यावरणाशी जुळवून घेता आले अशी जीवजनुके तगून राहिली. अन्य काळाच्या पडद्याआड गेली. त्यातल्या काहींचा सुगावा लागतो. अनेकांची वासलात ‘नाही चिरा नाही पणती’ या वर्गात मोडते. अन्य प्राण्यांप्रमाणेच मनुष्यप्राण्यालाही हे वर्णन लागू आहेच!

जगभर प्राणी आणि मनुष्यप्राणी इतर प्राणी यांचे जे पाळीव सहजीवी नाते आहे त्यात प्राचीन ठोकळमानाने पाळीवपणाचे दोन कालखंड आणि पायऱ्या मानल्या जातात. मूळ ‘रानटी’ अवस्थेतून माणसाची संगत लाभणारे, रुचणारे पाळीवपण उपजणे. दुसरा टप्पा पाळीव बनलेल्या प्रकारांमध्ये कृत्रिम संकर घडवून नव्या वळणाच्या पाळीव जाती-प्रकारांचा उदय होत राहणारे. कृत्रिम जाणीवपूर्वक संकरात विशिष्ट प्रकाराचे गुणलक्षण पैदासणे हा हेतू असतो. उदा. जास्त बी देणारे रोप, जास्त दूध देणारी गाय, इ. (मराठीत तर ‘आखूड िशगी बहु दुधी, कमी खाणारी पण शेण मात्र जास्त देणारी’अशी सर्वगुणसंपन्नपणाचा उपरोध करणारी ‘म्हण’च आहे!) या दोन्ही टप्प्यांची चर्चा डार्विनच्या ग्रंथामध्ये आढळते. पाळीवांच्या कृत्रिम संकराने जे जाणीवपूर्वक निवडले आणि घडवले जाते (आर्टिफिशिअल सिलेक्शन) तसेच काहीसे सृष्टीत अजाणता घडते म्हणून तर त्याने नैसर्गिक निवड किंवा सृष्टीचा वेचकपणा (नॅचरल सिलेक्शन) असा शब्दप्रयोग डार्विनने वापरला. पाळीव प्राण्यांच्या गुण आणि लक्षणांमधे माणसाच्या खटाटोपाचा वाटा आहे. त्याच बरोबरीने पाळीवांच्या लाभामुळे माणसाची जैविक घडणदेखील बदलत उत्क्रांत होत गेली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात तथाकथित आदिमानव ज्या प्रकारच्या आहारावर गुजराण करीत असे तो आहार आता माणसाच्या शरीराला हाताळता येणार नाही. तसेच माणसाच्या खटाटोपाने पैदासलेल्या पाळीव प्राण्यांना त्यांच्या वन्य प्रकारांप्रमाणे किंवा रानटी पूर्वजांप्रमाणे जगणे मुश्कील जाईल. पाळीवपणामध्ये कोणती जनुके बदलतात? कुठली नवी लक्षणे देणारी जनुके उदय पावतात याचा शोध घेणे हे पाळीवपण संशोधनाला आता कणा बनत चालले आहेत. उदा. पाळीव जनावरांच्या कातडय़ांचे रंग, त्यावरील केसाळ आच्छादन यांचे रंगरूप ठरविणारी जनुके किंवा प्रथिने ससा, कुत्रा, मांजर, डुक्कर, घोडा, शेळी, कोंबडी अशा विविध प्राण्यांमध्ये एकाच जनुक/ आणि प्रथिन प्रकाराची आढळतात. मेंदूच्या नियंत्रक भागातील पेशीमधील संदेशवाही आरएनएच्या फरकानुसार त्यांच्या वागण्यातील आज्ञाधारकपण आणि हिंस्र आक्रमकपण साकारणारे भेद सापडू शकतात, असे समोर आले आहे.

सारांशाने कृत्रिम निवड आणि नैसर्गिक वेचकपणा यांचा मिलाफ उत्क्रांतीच्या यात्रेत जनुकांच्या आणि भोवतालच्या स्थितीशी जुळवून घेण्याचा दबाव यामधून घडत गेलेला आढळतो. जनुकीय विश्लेषणामुळे असे कितीतरी अनपेक्षित पैलू पुढील काळात सापडत राहतील! तसेच जनुकीय तंत्रामुळे नव्या जीवजाती व प्रकारांची पैदास निराळय़ा जोमाने आणि क्षमतेने फोफावणार आहे. त्याला सामोरे जाताना माणसाच्या भू-स्थिर आणि सु-स्थिर उत्क्रांतीमध्ये पाळीवपणाचा मोठा पगडा आहे हे सत्य कदापि डोळय़ाआड होऊ देऊ नये.

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

pradiprawat55@gmail.com

Story img Loader