गुरुजी, असतात माणसांची काही स्वप्नं

उराशी घट्ट जपलेली,

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

विचाराच्या नाळेशी बांधलेली

त्याच्यासाठी लढतो माणूस

त्याच्यासाठी खपतो माणूस

पण सारे प्रयत्न करूनही

दिठीतून निसटून जाते पोर

तसे निसटून जाते स्वप्न

चुरशीच्या लढाईत

गुरुजी, चुरशीच्या लढाईत हरण्यातही

असतो आनंद विजयाचा

तुम्हीच सांगितला ना हा जीवनदर्शक मंत्र

आम्हा धडपडणाऱ्या मुलांना,

मग शोभतात का हो ही

आत्महत्याग्रस्त, हताश, हतबल कवने

‘सावर रे’ म्हणत स्वत:च हरवणे?

गुरुजी बघताय ना तुम्ही

तुमच्या मातृहृदयी चक्षूने

आता शाळा कशा चकचकीत झाल्यायत

सूजभरल्या समृद्धीने

नखशिखांत श्रीमंतीने सजलेले

शाळेचे समोरचे प्रवेशद्वार

त्याच्या दोन्ही बाजूला

सुरक्षा उपकरणांनी सज्ज रक्षक

गुरुजी, कसं सांगायचं हो त्यांना

आता करता येत नाही आत्महत्या

कुणालाच शाळेच्या प्रवेशद्वारात

संस्कृती म्हणजे हजारो वर्षांच्या

समूहाच्या एकत्रित वाटचालीचे

सांस्कृतिक संचित

गुरुजी, कितीही लिहिली असेल

काळजातील करुणेने तरी

एका व्यक्तीचा पराभव

हा असू शकतो काय संस्कृतीचा पराभव?

माणसांच्या सेवेत ज्यांना दिसतो ईश्वर

ते जगतात जगासाठी

त्यांचं जगणं उदात्त, मरणही तेजस्वी

गुरुजी, वैयक्तिक इच्छेच्या अपूर्णतेला

तुमच्या समर्पणाची जोड

कशी देता येणार?

व्यक्तिवादी अहंतेला

मानवतावाद कसे म्हणणार?

काय काय लिहिले गुरुजी, काय सांगावे?

इतिहासाचे चित्र किती उलटे टांगावे?

आंतरभारतीची स्वप्ने काय,

घामाची फुले काय?

पेशवाईतील ‘बार’भाई,

रामशास्त्रीचा अवतार काय?

साजरी होत आहे इथे

नारायणरावांची अखेरची किंकाळी

खरकसिंग, सुमेरसिंग, मोहरा मोजत देती टाळी

ढोलकीवर थाप जशी लावणीला

तसे इथे धरून धरून बांधले सारे ‘दावणी’ला

एकाच कारणासाठी कधी

उपयोगी नसतो प्राणवायू

लढणाऱ्याने नेहमी आपले फुरफुरून ठेवावे स्नायू

(साहित्य संमेलनाच्या घडामोडीवरील कवितेला दिलेले हे उत्तर असे कुणी म्हटले तर योगायोग समजावा)

– सुरेंद्र खोबणे , २६ जून दुपारी २