विज्ञान- तंत्रज्ञान यांच्या संगमांमुळे जागतिक सत्तेचा लंबक झुलता राहिला तो कसा आणि त्यातून जग वसाहतवादापर्यंत कसे पोहोचले, याचा वेध ‘तंत्रकारण’ या लेखमालेच्या या तिसऱ्या भागात… कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा मार्ग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकार घेतो. तंत्रज्ञानाचे मानवी जीवन सुलभ करणे हे सर्वात मूलभूत ध्येय असते. अगदी सुरुवातीच्या काळात मानवी निरीक्षण, कुतूहल आणि गरज यांची तंत्रज्ञान विकासात प्रमुख भूमिका होती. पुढे त्याचा एका प्रणालीअंतर्गत विकास होऊन विज्ञान या शाखेचा उदय झाला. म्हणजेच तंत्रज्ञान-विकास नैसर्गिक होता तर विज्ञानाच्या विकासासाठी व्यवस्थेला प्रयत्न करावे लागले, ज्याची परिणती गुंतागुंतीच्या तंत्रज्ञान विकासात झाली. या विज्ञान- तंत्रज्ञान यांच्या संगमांमुळे जागतिक सत्तेचा लंबक झुलता राहिला. प्राचीन काळी भारतीय उपखंड हा नागरीकरणाचे आणि अर्थकारणाचे केंद्रबिंदू होता. त्यानंतर इस्लामच्या सुवर्ण युगात (८ वे ते १३ वे शतक) बगदाद, कैरो आदी शहरे खलिफाच्या नेतृत्वाखाली उदयास आली. त्याहीपुढे, युरोपीय प्रबोधन काळानंतर झालेल्या सुधारणांना युरोपमधील सत्तेचे गणित बदलले आणि पाश्चिमात्य राष्ट्रे राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक ठसा यांमध्ये अग्रेसर बनली. बारकाईने पाहिल्यास उमगेल की जिथे विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला तिथले समाजाचे-राजकारणाचे आयाम बदलून गेले आणि ते समाज समृद्ध झाले. उलटपक्षी ज्याक्षणी त्या समाजाने आपली कवाडे चिकित्सक विचारांसाठी बंद केली, आपली शक्ती स्वकौतुकात खर्च करण्यास सुरुवात केली, त्यांच्या अध:पतनास सुरुवात झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा