प्राज्ञपाठशाळा, वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून सन १९१८ मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादनार्थ काशीस प्रयाण केले. स्वामी केवलानंद सरस्वतींचे शिष्य योगानंद महाराज यांचा एक मठ बिंदुमाधव घाटावर होता. तिथे त्यांची राहायची व्यवस्था झाली. तर्कतीर्थ पदवीसाठी न्याय, वेदांत, शाब्दबोध (व्युत्पत्तीवाद) यांचे अध्ययन आवश्यक होते. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते वेगवेगळ्या शास्त्री-पंडितांकडे जाऊन पूर्ण केले. पैकी वेदांत त्यांनी पर्वतीयशास्त्री यांच्याकडे पूर्ण केला. न्यायाचे शिक्षण वामाचरण भट्टाचार्य यांच्याकडून घेतले. नव्यन्यायाचा काही भाग ते भंडारीशास्त्रींकडून न्यायाचार्य राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्याकडे नव्यन्याय पूर्ण केला. शिकले.

प्राज्ञपाठशाळेत जी शिस्त होती, तिचा वाराणसी (काशी) येथील पाठशाळांमध्ये अभाव होता. पंडितांकडे शिष्य केव्हाही जाण्यास मोकळे असत. ते गुरूंशी मुक्तपणे चर्चा करू शकत. इथे शिक्षणाची अशी ही अनौपचारिक, मुक्त व्यवस्था होती. काशीत त्या वेळी अनेक नामांकित पंडित होते. नव्यन्यायाची व्युत्पत्ती विविध शास्त्री-पंडितांकडून पूर्ण झाल्यावर लक्ष्मणशास्त्रींनी स्वयंअध्ययन सुरू केले. ‘जागदीशी’, अनुमानखंडातील पञ्चावाद आणि उत्तरवाद, ‘न्यायसूत्र’, विश्वनाथ पंचानन भट्टाचार्य लिखित ‘वृत्ती’, इ. ग्रंथ वाचनाने लक्ष्मणशास्त्रींनी नव्यन्यायाची तयारी केली.

Loksatta editorial US National Security Advisor Jake Sullivan Nuclear deal Narendra Modi
अग्रलेख: अणू हवा,‘अरेवा’ नको!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
ulta chashma
उलटा चष्मा: विकले गेलेल्यांची किंमत शून्य!
Loksatta anvyarth Canadian Prime Minister Justin Trudeau resigns India Canada Relations
अन्वयार्थ: अखेर ट्रुडो जाणार!
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
loksatta readers feedback
लोकमानस: साम्राज्य उभे करण्यासाठी निधीचा वापर

काशीमध्ये साहाध्यायी आणि पंडितांमध्ये वाद व शास्त्रार्थ चालायचे, शिवाय विविध घाटांवर पाच, सात, नऊ दिवसांचे शास्त्रार्थ व्हायचे. ते बहुधा न्याय आणि व्याकरणावर आधारित असत. शास्त्रार्थाची पद्धती रूढ, पारंपरिक असे. सुधारक आणि सनातनी यांच्यात शास्त्रार्थावरून वादविवाद, खण्डनमण्डन होत असे; पण शब्दप्रामाण्य सोडण्यास पंडित वर्ग सहसा तयार नसायचा. समयबंध असायचा. म्हणजे मान्य चौकटीतच चर्चा अपेक्षित असायची. या सर्वांतून नवशिक्षित पंडितांना मार्गदर्शन आणि अनौपचारिक शिक्षण, प्रशिक्षण मिळायचे.

अभ्यास तीन वर्षांत पूर्ण करून सन १९२२-२३ ला लक्ष्मणशास्त्रींनी ‘तर्कतीर्थ’ पदवी प्राप्त केली. कलकत्ता येथे शासकीय संस्कृत महाविद्यालय ही परीक्षा योजून पदवी देत असे. पदवी बहुप्रचलित राहिल्याने ती पदवीच त्यांचे पद बनले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची नव्यन्यायावर ग्रंथ लिहिण्याची इच्छा होती; पण ते धर्मसुधारणा कार्यात व्यग्र राहिल्याने हे लेखन कायमचे राहून गेले. ‘तर्कतीर्थ’ पदवी मिळाल्यावर ते काशीहून परत येऊन प्राज्ञपाठशाळेत अध्यापक झाले. अध्यापक म्हणून प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थांनी नव्यन्याय, मीमांसा, व्याकरण शिकविले. ‘मीमांसान्यायप्रकाश’ ग्रंथाचे तर्कतीर्थांनी अनेकदा अध्यापन केले. पुढे वेदांताचेही अध्यापन केले. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे, पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांसारखे त्यांचे शिष्य पुढे संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. तर्कतीर्थ पुढच्या काळात धर्मसुधारणा, समाजसुधारणा, स्वातंत्र्य चळवळीतील प्रबोधन, संघटनकार्यात व्यस्त झाले, तसे त्यांचे अध्यापन बंद झाले. त्यांनी अध्यापक पदाचा राजीनामा दिला, तरी ते प्राज्ञपाठशाळेत अन्य कार्याने संलग्न राहिले.

तर्कतीर्थांनी नंतरच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाच्या बरोबरीने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्यातील पंडित उदारमतवादी आणि आधुनिक बनत गेला. सर्वधर्म अभ्यासाने त्यांना वैश्विक बनवले. ‘हिंदुधर्म समीक्षा’ ते ‘सर्वधर्मसमीक्षा’ असा त्यांचा लेखनप्रवास असो वा ‘आनंदमीमांसा’ आणि ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’सारखे प्रबंध लेखन असो, त्यातून तर्कतीर्थ धर्मनिरपेक्ष होत गेले! नित्य स्नान-संध्या करणारा हा धर्मपंडित जीवनाच्या एका वळणावर कर्मकांडमुक्त होतो ते ज्ञानाचे सत्य रूप गवसल्यामुळे. पत्नी सत्यवतीने एकदा ‘देव पारोसे राहतात पूजेअभावी’ असे म्हटल्यावर, तर्कतीर्थ देव्हाऱ्यातील सर्व देव, टाक आणि मूर्ती कृष्णार्पण करतात. अनेक वर्षांच्या संस्कारांतून निरीच्छपणे मुक्त होणे, हे प्रखर बुद्धिवादी विचार आणि कृतीनेच शक्य असते. नास्तिक म्हणवून घेणाऱ्यांनाही जी गोष्ट अशक्य वाटे, ती तर्कतीर्थ केवळ वैचारिक प्रतिबद्धतेमुळे (करेज ऑफ कन्व्हिक्शन) करू शकले. देव, धर्म, पूजा, इ. सर्व गोष्टी या मूलत: भाव आणि श्रद्धेचे आंतरिक विषय होत. आपण ते प्रतीक, पूजा नि कर्मकांडात अडकवलेत. ज्ञान, सत्य ही तत्त्वे उमगली की मग ती जीवनमूल्ये व जीवनशैलीची अंगे बनतात, बाकी सर्व मग शून्य ठरते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com

Story img Loader