विधिमंडळाच्या रचनेत आणि कार्यपद्धतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात येथील सदस्य. अर्थात आमदार. आमदार असण्यासाठी काही पात्रता निश्चित केलेल्या आहेत. संविधानाच्या १७३ व्या अनुच्छेदाती तरतुदींनुसार आमदार पदासाठी व्यक्ती भारताची नागरिक हवी. तिने संविधानाची शपथ घेतली पाहिजे. राष्ट्राचे अखंडत्व टिकवण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. विधानसभेसाठी वयाची २५ तर विधान परिषदेसाठी वयाची ३० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. संसदेने १९५१ मध्ये लोकप्रतिनिधी कायदा पारित केला. त्यात आमदारांच्या आणि खासदारांच्या पात्रतेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. या कायद्यानुसार आमदार म्हणून पात्र असण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे: (१) विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी व्यक्ती संबंधित मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. विधान परिषदेवर काही जणांना नामनिर्देशित केले जाते आणि मग ते आमदार होतात. अशा प्रकारे नामनिर्देशित होण्यासाठी ती व्यक्ती संबंधित राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. (२) विधानसभेत आमदार होऊ इच्छिणारी व्यक्ती संबंधित राज्यातील मतदारसंघात मतदार असणे जरुरीचे आहे. (३) काही विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता राखीव असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा