राजेश बोबडे

१९६८ मध्ये अंतिम समयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रुग्णशय्येवरून जनतेला उद्देशून दिलेला आर्त संदेश चितंनीय आहे. महाराज म्हणाले, ‘‘लोक माझ्याजवळ निरनिराळया विचारांनी येतात- पारमार्थिक विचारांनी, आध्यात्मिक विचारांनी व सामाजिक विचारांनी येतात; तसेच आपल्या सुखदु:खाच्या विचारांनीही येतात. मी त्या सर्वांना त्यांच्या परीने सर्व तऱ्हेचा खुराक देण्याचा जन्मभर प्रयत्न केला आहे. ग्रंथरूपाने, भजन-भाषण रूपाने, प्रार्थनारूपाने, रामधूनरूपाने, ग्रामस्वच्छतेच्या रूपाने, लग्नसंस्कारांच्या व मृत्यु-संस्काराच्या रूपाने सर्व तऱ्हेने मला आवश्यक वाटला, तो तो विचार मी त्यांना देत आलो आहे. माझा त्या विचारावर विश्वास आहे, कारण मला त्या सर्वांचे मूळही माहीत आहे. मनुष्य प्राणी हा काही एकटयासाठी जन्माला आला नाही. तो सामूहिक जीवनासाठी आणि समूहाने जगण्यासाठी जन्मला आहे. समूहाचे कल्याण करण्यासाठी जन्मला आहे. तेव्हा आता मला काही जास्त सांगावे असे वाटत नाही.’’

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा

हेही वाचा >>> चिंतनधारा : ‘युनेस्को’ परिषदेत राष्ट्रचिंतन

‘‘अशा अवस्थेत आजही हे धन सर्वांजवळ उपलब्ध आहे. सामान्य सेवकासाठी आहे. साहित्यिका, आध्यात्मिक असेल त्याच्यासाठी आहे. राजाकरणी असो वा विश्वव्यापी भावनेचा असो त्याच्याहीसाठी आहे. असे सर्वांकरिता मी माझ्या परीने काही ना काही ठेवले आहे. आता आपले कर्तव्य एकच आहे की, मला विचारावयाचे नाही; काय करायचे असेल ते करावे, दाखवावे, त्याचे दर्शन घडवावे. प्रत्येक सेवकाने, कार्यकर्त्यांने, आपापले क्षेत्र निवडून त्याच क्षेत्रामध्ये काही करून दाखवावे. १०, २०, २५ वर्षे कार्य करत राहावे, हेच माझ्या दृष्टीने मला महत्त्वाचे वाटते.’’

‘‘गुरुकुंज आश्रम सर्वांचा आहे; परंतु काम करण्याचे क्षेत्र भारतवर्ष आहे. म्हणून गुरुकुंजाकडे आपण एक स्फूर्तिकेंद्र या दृष्टीने पाहावे आणि आपले क्षेत्र कामाच्या दृष्टीने त्या त्या विभागात आटोपावे अशी ही योजना माझ्या दृष्टीने मला योग्य वाटते. आपणा सर्वांना माझ्या आजाराबद्दल मोठे आश्चर्य वाटत असेल, पण मला त्याचे काही आश्चर्य वाटत नाही. मला त्याची प्रथमपासूनच जाणीव होती, म्हणूनच या वर्षांत मी इतका फिरलो. नाहीतर माणूस कधी इतका फिरूच शकत नाही. मला वाटले की आपल्या उर्वरित वेळात समाजाची जास्तीतजास्त सेवा करता आली तर करावी. म्हणून सारखा फिरलो; आणि त्या फिरण्याचे दिवस संपले, म्हणूनच मी बसलो.’’

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : उत्तम पाचारणे

‘‘तेव्हा, आपणा सर्वांचे कर्तव्य आता हेच असू शकते की, या वाङ्मयाला करोडोमुखी व कानी जाऊ द्यावे; हजारो भाविकांत ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची कीर्ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता ‘परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम्’ या प्रवृत्तीने ती समजून घेतली पाहिजे – वाढविली पाहिजे.’’ महाराज म्हणतात,

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ। त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ।

घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ। ग्रामगीता-वाचनाचा।।

rajesh772@gmail.com

Story img Loader