राजेश बोबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, १ ऑक्टोबर १९४९ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात एकदा तापाने मी आजारी पडलो तेव्हा गांधीजींनी स्वत: माझी शुश्रूषा केली एवढी सेवापरायणता त्यांच्यात होती. सामान्य माणूस कर्तव्य टाळण्यातच आपली बुद्धिमत्ता खर्च करतो. मोठे लोक जे सांगतात ते अचूकपणे कसे टाळावे एवढेच तो पाहतो. थोरामोठय़ांच्या नावाखाली कसाबाची करणी करावयालाही आजवर लोक कचरले नाहीत व आजही तसेच घडण्याचा रंग दिसत आहे. आज जो तो ‘महात्मा गांधी की जय!’ म्हणतो. चोरी करायची असली, जातीयता वाढवावयाची असली, नवीन पक्ष काढावयाचा असला.. तरी हे बहाद्दर ‘गांधीजी की जय!’ पुकारण्यास मागेपुढे पाहात नाहीत.
हेही वाचा >>> चिंतनधारा : सत्कार्याला प्रोत्साहन देणे गरजेचे!
गांधीजींनी जी शिकवण दिली ती मात्र हे लोक अगदी तंतोतंत विसरतात. आमचा विजय सत्याने होईल की हिंसेने याचा धडा महात्मा गांधींनी आपल्या स्वत:च्या अनुभवाने व दूरदृष्टीने विचार करून लोकांपुढे ठेवला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आपण काय पाहातो? गांधीजींचे अपुरे कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी जेवढी सरकारवर आहे तेवढीच जनतेवर नाही काय? पण याचा इमानेइतबारे आपण आज विचार करीत आहोत काय? आणि तसा विचार जर आज आपण करीत नसू तर आज आपण गांधी जयंतीचा केवढाही गाजावाजा केला तरी त्यात काय अर्थ उरेल! वास्तविक ज्याची जयंती आदरपूर्वक साजरी करावयाची त्याची तत्त्वे लोकांनी आचरणात उतरवली पाहिजेत. गांधी जयंतीच्या दिवशीच फक्त खादी घातली, त्याच दिवशी चरखा चालवला व ग्रामसफाई केली, सामुदायिक प्रार्थनाही याच दिवशी केली व ‘गांधीजी की जय’ म्हणून गुणवर्णनपर भाषणे ठोकली व नंतर स्वस्थ बसलो तर गांधीजींच्या आत्म्याला समाधान लाभणार नाही.

गांधीजींनी ज्या रामराज्याची दृष्टी भारतवासीयांना दिली, त्यासमोर जगातील कोणताच वाद श्रेष्ठ ठरू शकत नाही. पण त्याची अंमलबजावणी मात्र आम्ही केली पाहिजे. तसे करूनच आपण गांधी जयंती साजरी करू शकतो. चरखा लाकडीच असावा व ठरलेल्या गतीपेक्षा अधिक गतीने सूत निघू नये यातच खरे स्वावलंबन आहे असे मी समजत नाही. सध्या आपल्या देशात काम करणाऱ्यांपेक्षा काम करवून घेणारेच लोक अधिक निर्माण झाले आहेत. काम करणाऱ्याचे मूल्य समजले पाहिजे. ही वृत्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. शेतकऱ्यांचे सुखदु:ख मजुरांना व मजुरांचे सुखदु:ख शेतकऱ्यांना तसे खेडय़ांचे सुखदु:ख शहरवासीयांना व शहरवासीयांचे खेडय़ांना अशी स्थिती निर्माण झाली पाहिजे. दुसऱ्यांच्या पुढे उभे राहून आपले उखळ पांढरे करणाऱ्यांची जी दुष्ट प्रवृत्ती आज समाजात घुसली आहे तिचा नायनाट करण्याचा आपण विडा उचलला पाहिजे. आपला देश धनधान्याने, चारित्र्याने, प्रतिष्ठेने व उद्योगाने उन्नत करून जगात चमकवला तरच रामराज्य निर्माण होईल. जयंत्या, उत्सव व पुण्यतिथ्या करताना आपले लक्ष दु:खी जीवन सुखी करण्याकडे राहावे व आपली राष्ट्रीय वृत्ती जागृत असावी हेच गांधीजींच्या जीवनाचे सार आहे.
rajesh772@gmail.com