राजेश बोबडे

व्यक्तिपूजा समाजासाठी अत्यंत घातक आहे, हे लक्षात आल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचे गुरू संत आडकुजी महाराजांची व्यक्तिपूजा सोडून त्यांच्या तत्त्वांना आचरणात आणून श्रीगुरुदेव सेवा मंडळ निर्माण केले. महाराज स्वत:लाही ‘मै भी हू मजदुर प्रभू का खबर दिलाने आया हू, तुकडय़ादास!’ म्हणत. महाराज म्हणतात, ‘‘मंडळाचे अधिष्ठान म्हणजे गुरुदेवशक्ती. त्यात व्यक्तीची उपासना नाही. ज्या ज्या ठिकाणाहून बोधज्ञान मिळेल ते घ्यायचे. ज्यांच्यापासून घेतले त्यांना आदर व मान देऊ, परंतु एकाच व्यक्तीला देव मानण्याची भावना मला समाजात ठेवायची नाही. त्यांचे फक्त शुद्ध तत्त्वज्ञानच राखावयाचे आहे. आदर सर्वाचा करावा, परंतु आत्मशक्ती, अदृश्य दैवीशक्ती यांनाच आम्ही देव म्हणू व म्हणूनच या अधिष्ठानावर सर्व देव येऊ शकतात. गुरुदेव म्हणजे ज्ञानशक्ती, ब्रह्मशक्ती किंवा बोधशक्ती. मात्र परब्रह्म सर्वत्र असल्याने त्याची उपासना कशी करणार, हा प्रश्न निर्माण होतो. ज्ञानशक्ती, बोधशक्ती असणारी मंडळी गुरुदेवाच्या योग्यतेची असली, तरी ती शक्ती मात्र स्वतंत्र आहे.’’

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : हीच ‘सप्रेम इच्छा’अनेकांची!

हेही वाचा >>> चिंतनधारा: भक्त मंडळींचे सामाजिकीकरण..

‘‘उद्या श्रीकृष्ण वा श्रीराम प्रगट झाले, तरी त्यांनासुद्धा आम्ही प्रार्थनेच्या अधिष्ठानावर बसविणार नाही. कारण ते त्या ईश्वरी शक्तीचे मार्गदर्शक (देहधारी पुरुष) होत. इतकेच काय परंतु पूर्वी झालेले व पुढे होणारे अवतार, संत व महात्मे यांना आम्ही मार्गदर्शक समजतो. फक्त परब्रह्मालाच आम्ही ‘गुरुदेव’ समजतो. पण त्याला ‘गुरुदेव’ म्हणण्याचे कारण असे की ‘परब्रह्म’ म्हणण्यात उपास्य-उपासक भाव येत नाही व गुरुदेवशक्ती मानण्यात उपास्य- उपासक भाव येतो. अर्थात आम्ही व्यक्तीचे पूजक नसून आत्मशक्तीचे उपासक आहोत. ज्यांच्या अंत:करणात आत्मशक्ती असेल तेच आमचे मार्गदर्शक व त्यांच्यामधील शक्तीचे आम्ही पूजक. म्हणूनच सर्व धर्मातील मान्य झालेले, दैवीशक्तीच्या, आत्मशक्तीच्या मार्गावर जनतेस नेणारे लोक आम्हास आदरणीय आहेत. धर्म, पंथ, संप्रदायबुद्धीचे भिन्नत्व आत्मशक्तीच्या मार्गावर आम्हास आड येऊच शकत नाही.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : शुद्ध आचार हाच खरा धर्म

‘‘सेवा मंडळाची स्थापना करण्यापूर्वी मी व्यक्तिपूजक होतो. श्री आडकुजी महाराज एक महान संत होते. त्यांच्याद्वारे जनतेस बोध देण्याचा माझा विचार होता. परंतु तसे करण्याने व्यक्तिपूजेचे महत्त्व वाढून एक नवीन परंपराच निर्माण झाली असती. उदा. – खंडोबा हा एक उपासक होता. पण आज त्याचेच देऊळ बांधून संप्रदाय निर्माण करण्यात आला आहे. माझ्या लक्षात हे तत्त्व ज्या दिवशी आले त्याच दिवशी श्री संत आडकुजी महाराजांची व्यक्तिपूजा मी सोडली व गुरुदेवांच्या अधिष्ठानातच उपासना करण्याच्या तत्त्वाचा अंगीकार केला. आता या तत्त्वापासून जगातला कोणताही संप्रदाय अलग पडू शकत नाही. उपासनेची व्यक्तित्वाच्या भावनेवर आधारलेली पद्धतच आम्हाला मोडून टाकायची आहे. गुरुदेवाचे अधिष्ठान निर्माण करताना आम्हास एक देव निर्माण करावा लागेल, याची आम्हास कल्पना होतीच,’’ असे तुकडोजी महाराज म्हणतात.

rajesh772@gmail.com