मांसाहारी खाद्यपदार्थाच्या जाहिरातींवर आक्षेप ही बातमी (२६ सप्टेंबर) वाचली आणि आश्चर्य वाटले. याबाबत मी काही बाळबोध आक्षेप घेऊ इच्छितो. जे कट्टर जैन धर्मीय शाकाहारी आहेत त्यांच्या बाबत हे लागू आहे. त्यांच्याकडे रोज कचरा नेण्यासाठी सफाईवाला येतो, वृत्तपत्र देणारा येतो ते शाकाहारी असतात का? जैन धर्मीय मोठे उद्योजक/ व्यावसायिक आहेत त्यांच्या कंपनीत/ दुकानांतून काम करणारे सगळे शाकाहारी असतात का? ते अनेक ठिकाणांहून वस्तू घेतात त्या आस्थापनांचे नोकर/मालक फक्त शाकाहारी असतात? ते ज्या कोर्पोरेट्समध्ये गुंतवणूक करतात ते उत्पादनात कोणताही मांसाहारी पदार्थ वापरत नाहीत? देशविदेशात मोठमोठय़ा माणसांबरोबर जेवताना. जैन व्यक्ती भलेही शाकाहारी जेवण घेत असतील, पण त्यांच्याबरोबर जेवणारे मांसाहार करत नाहीत का? विमान प्रवासात त्यांना पदार्थ देणारे कर्मचारी शाकाहारीच असतात का? असे अनेक बाळबोध प्रश्न मला पडले आहेत. त्यांची उत्तरे या आक्षेप घेणाऱ्या जैन बांधवांकडून मिळतील का? ही भारतीय लोकशाही आहे येथे कोणी काय खावे आणि पैसे मिळविण्यासाठी कशाच्या जाहिराती कराव्यात यावर निर्बंध नसावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा