‘किती मी राखू तुमची…’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकेबरोबरच्या संबंधात आपले बोटचेपे धोरण आयात शुल्कात केलेल्या कपातीवरून दिसून येते. अमेरिकेने काहीही केले तरी आपण काहीच करू शकत नाही ही त्यामागील पराभवाची भावना अधोरेखित होत आहे. चीन, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या मालावर अनुक्रमे १० आणि २५ टक्के आयात शुल्क अमेरिकेने लादल्यामुळे या देशांनीही अमेरिकेच्या मालावर आयात शुल्क वाढविले आहे. हे जशास तसे उत्तर आहे. त्याचा अमेरिकेला काही फटका बसेल असे नाही, मात्र याचे जे काही परिणाम होतील, ते भोगण्यास आम्ही तयार आहोत हेच चीन, कॅनडा आणि मेक्सिकोने ट्रम्प यांना सांगितले आहे. आम्ही अमेरिकेला जुमानत नाही असाही इशारा त्यांनी दिला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. पण भारतावर मात्र अमेरिकेच्या मालावर आयात शुल्क कमी करण्याची नामुष्की ओढवली आहे, असे म्हणावे लागेल!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा