‘नक्षलींचा निकाल’ हे संपादकीय (८ मार्च) वाचले. साईबाबा यांची न्यायालयाच्या आदेशाने दहा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली. उच्च न्यायालयाने साईबाबा यांना दोन वेळा निर्दोष ठरवूनही सरकारने त्यातून योग्य धडा घेतलेला नाही. सरकार आता सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे. माझे आयुष्य उद्ध्वस्त केले असा साईबाबा यांनी सरकारवर आरोप केला आहे. एवढी अमानुष वागणूक इंग्रज सरकारनेही क्वचितच एखाद्याला दिली असेल. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता झाली असेल, पण त्यांच्या आयुष्यातील दहा वर्षे वाया गेली त्याचे काय? त्यांचे झालेले शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान सरकार कसे भरून देणार? पीएमएलए कायदा किंवा यूएपीए कायदा यांचा वापर गेल्या दहा वर्षांत सतत वाढत गेला आहे. मात्र त्यातील खटल्यांमध्ये आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण नगण्यच राहिले आहे. तरीही अशा कायद्यांचा वापर करून सरकार त्यांच्या विरोधकांना वर्षानुवर्षे तुरुंगात ठेवू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा