‘‘संघ’शक्तीचा विजय’ (२४ नोव्हेंबर) हे संपादकीय वाचले आणि विश्लेषण पटले, परंतु महायुती लोकसभेच्या अपयशाचा वचपा सुतासहित भरून काढेल असे निकालापूर्वी मात्र वाटले नव्हते. असो यश हे यशच असते आणि मेहनत करून मिळाले की त्याची गोडी अजून वाढते. काही मुद्दे नमूद करावेसे वाटतात : (१) हे यश म्हणजे महायुतीची मेहनत आणि विरोधकांना लोकसभेच्या यशाच्या धुंदीतून बाहेर यायला लागलेला वेळ. (२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय असणे किती महत्त्वाचे आहे हे राज्यातील भाजपनेत्यांना पटल्याने महाराष्ट्रातील विधानसभेच्या यशासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यानंतर संघाने केलेले काम. (३) लाडक्या बहिणींनी भावांना सत्तेत यायला चांगलीच मदत केली आहे याबद्दल शंका नाही. फक्त त्यासाठी तिजोरीत झालेली घट आणि अजून होत राहणारी घट कशी भरून काढायची आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (४) ओबीसींना वळविण्याची धूर्त खेळी खूपच मदतीची ठरली आहे. (५) विरोधक जनतेला स्वत:चे महत्त्व पटवून देण्यास कमी पडल्याने आणि आपापसातील मतभेद टाळू न शकल्याने आणि ते मतभेद जनतेसमोर जाहीरपणे आल्याने, ते काही करू शकतील यावरचा जनतेचा विश्वास उडाला असावा (६) त्यामुळे शरद पवार साहेबांनी तरुणांनाही लाजवेल अशा केलेल्या प्रचाराचे म्हणावे तेवढे चीज झाले नाही. (७) अदानी आणि धारावी हे मुद्दे महाविकास आघाडीला यश देण्यास कमी पडले. आता अदानीचे हात अमेरिकेने धरण्याचे ठरविले आहेच त्यामुळे त्यांचे जे व्हायचे ते होईल!

आता पहायचे, या यशाची माळ दिल्लीहून कोणाच्या गळ्यात पडते…

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!

● नीता शेरे, दहिसर पूर्व (मुंबई)

हेही वाचा >>> संविधानभान : राष्ट्रीय आणीबाणीची पार्श्वभूमी

मुद्द्यांपासून दूर असलेल्या दोन बाजू

‘‘संघशक्तीचा विजय’ हा अग्रलेख (२४ नोव्हेंबर) वाचला. या निकालातून भाजपने विरोधकांना तर चारही मुंड्या चीत केलेच पण त्याच वेळी महायुतीतील मित्रांवरही वचक बसवला. त्याची कारणमीमांसा करताना महायुतीच्या बाजूचे तीन घटक स्पष्टपणे दिसतात : लाडकी बहीण योजनेतून प्रत्यक्ष आर्थिक मदत, अल्पसंख्याकांच्या धोक्याचा काल्पनिक बागुलबुवा (व त्यासाठी समाजमाध्यमांचा हुशारीने केलेला वापर) आणि रा. स्व. संघाची सक्रिय मदत. पहिल्या दोन घटकांतून अनुक्रमे गरीब व मध्यमवर्गीयांवर प्रभाव पाडण्यात भाजप प्रचारकांना यश आले. या तिन्ही घटकांसमोर महाविकास आघाडी निरुत्तर झाली. उलट आघाडीतील अकाली प्रकटलेले हेवेदावे, काँग्रेसचे निष्प्रभ नेतृत्व, ‘संविधान बचाव’ची राज्यातील निरर्थकता, गद्दारीबद्दलची उद्धव ठाकरे यांची नैतिक व भावनिक तक्रार आणि भावी आश्वासने यांऐवजी खात्यांत प्रत्यक्ष जमा झालेले रोख पैसे व ते देणारे मतदारांनी लक्षात ठेवले आणि ‘अधिकस्य अधिकं फलंह्ण या आशेने मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला. शिरस्त्याप्रमाणे, काँग्रेसने त्यांच्या जिंकण्याबाबतच्या ‘अतर्क्य निरीच्छेचा’ प्रत्यय देत आणखी एका संभाव्य विजयाचे अभूतपूर्व पराभवात रूपांतर करून दाखवले. महागाई, बेरोजगारी व तोट्यातील शेती या राज्यापुढील मूळ प्रश्नांबाबत दोन्ही बाजूंकडे सांगण्यासारखे काही नव्हते हेही लक्षणीय. एकूण, ही लढत संघटित व प्रत्यक्ष आर्थिक मदत करणारे विरुद्ध अंतर्कलहग्रस्त व भविष्यातील आश्वासने देणारे यांच्यात झाली व याचा अटळ परिणाम निकालात दिसला.

● अरुण जोगदेवदापोली

अटळ भगवेकरण कसे थांबवणार?

लोकसभेच्या वेळचा एकोपा अधिक घट्ट करून जिवाचे रान करण्याऐवजी महाविकास आघाडीने लाडक्या बहिणीशेजारी महालक्ष्मी उभी करण्याचा बालिशपणा केला. महिलांच्या शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि रोजगाराचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडणे हाच लाडक्या बहिणीसाठी योग्य प्रतिसाद होता. भले त्यामुळे विधानसभा जिंकता आली असतीच असे नाही पण एवढी दुर्दशा झाली नसती. असो.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने राजकारण आधीही प्रतीकात्मकच होते. पुरोगामी आणि प्रतिगामी या विभागणीशी नव्या पिढीला काही देणे-घेणे नाही. या पार्श्वभूमीवर आज, महाविकास आघाडी पुन्हा उभारी घेऊन महाराष्ट्राचे अटळ भगवेकरण थांबवू शकेल काय? एवढीच चिंता उरली आहे. पालिका निवडणुका ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे.

आत्मसंतुष्टतेचा आणि निष्क्रियतेचा पराभव होणारच होता तो झाला. त्यामुळे कुणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. तरीही संवेदनशील जाणकारांना शरद पवारांबद्दल सहानुभूती वाटणे साहजिक आहे.

● वसंत शंकर देशमाने, मु. पो. परखंदी (ता. वाई, जि. सातारा)

यापुढेही काम बाकी आहे…

लाडकी बहीण’ हा एक तात्पुरता पर्याय आहे. खरे तर त्यांना कायमस्वरूपी व स्वअर्जित उत्पन्न मिळण्यासाठी नव्या सरकारने योग्य तो रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शिवाय, आज समाजात अशी परिस्थिती आहे की बालिकेपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत सुरक्षितता नाही. ती घरादारात कुठेही नाही. त्यासाठी कुटुंबांतर्गत तसेच शिक्षण संस्था, कामाची ठिकाणे, रस्ते… सर्वत्र सुरक्षा मिळायला हवी. सरकारला सर्वाकडे लक्ष देणे कठीण आहे हेही मान्य; परंतु त्यासाठी प्रशासनाबरोबर सामाजिक व शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था न्यायपालिकेतील व्यक्ती या सर्वानाच विश्वासात घेऊन जेथे आवश्यक आहे तेथे प्रबोधन, शिक्षण देऊन ही मोठी जबाबदारी उचलायची आहे. आज समाजातील सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनी सर्वानी मिळून जनतेसाठी कामे करूया असे आवाहनही केले आहे. प्रचंड बहुमत मिळाले म्हणून सत्ताधाऱ्यांनी माजून न जाता व आम्हाला जनतेने डावलले म्हणून विरोधी पक्षांनी नाउमेद न होता महाराष्ट्राचा कारभार सर्वोत्तम कसा होईल याकडे लक्ष द्यावे व जनतेनेसुद्धा सीमित नजरेने न बघता एकत्रित हा गाडा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी शासनाला व प्रशासनाला मदत करावी.

● सुधीर ब. देशपांडे, ठाणे

महाविकास आघाडीने आत्मचिंतन करावे

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला आणि भाजपला मिळालेल्या नेत्रदीपक यशाचे सर्व श्रेय मतदारांना आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी मधल्या नेत्यांनी विशेषत: भाजपाला आणि शिंदे गटाला नको-नको ती दूषणे लावण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न मतदारांनी हाणून पाडल्याचे निकालांवरून दिसून आले. महाविकास आघाडी मधल्या अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला. शरद पवार हे ज्येष्ठ आणि मुरब्बी नेते असूनदेखील त्यांनी आखलेली रणनीतीसुद्धा कुचकामी ठरली. महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या वल्गना पूर्णपणे फोल ठरल्या. लोकसभेच्या निकालांनंतर या आघाडीमधल्या नेत्यांनी दाखवलेला अति आत्मविश्वास नडला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी पराभवाचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.

● अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

बहिणींसाठी आता हेही कराच…

अखेर भाजप – शिंदे गटाने बाजी मारली. आता नवीन सरकारने एक निर्णय त्वरित घ्यावा. तो म्हणजे आमदारांना तहहयात मिळणारे आर्थिक लाभ वा निवृत्तिवेतन थांबवावे. निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांची जी आर्थिक संपत्ती दैनिकांतून जाहीर झाली आहे ती सामान्य मतदारांच्या कल्पनेबाहेर आहे. जवळपास सारे करोडपती! त्यामुळे सरकारचा आर्थिक भार कमी होईल आणि यातून जो पैसे वाचेल तो लाडक्या बहिणींना देता येईल.

● मार्कुस डाबरेपापडी (वसई)

या दोघांनीच त्यांचे नाव सुचवावे…

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचा स्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला आणि त्यातही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या जनादेशाचा आदर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पुढल्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचवावे. त्यांच्या-त्यांच्या पक्षाच्या आमदारांनीही यास एकमुखाने पाठिंबा द्यावा. हा एक निर्णय जनमत या नेत्यांच्या बाजूने वळवू शकेल आणि भविष्यकाळात त्याचा पक्षाला लाभ होईल. इथे वैयक्तिक मत बाजूला ठेवून राज्याच्या हिताचा आणि जनादेशाचा आदर करण्याची ही सुवर्णसंधी आहे असे त्यांनी मानावे. ● विजय देवधर, पुणे

Story img Loader