‘सावली, सावट, सौजन्य, सावज!’ हा अग्रलेख (लोकसत्ता, ६ डिसेंबर) वाचला. सत्तासोपान चढण्यास मदत केलेल्या एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजपच्या ‘शतप्रतिशत भाजप’ अभियानात आपला स्वाभिमान गहाण ठेवून ‘राजकीय मांडलिक’ राहण्याशिवाय भाजप व त्यांच्या मुत्सद्दी चाणक्यांनी पर्यायच ठेवलेला नाही. शपथविधीच्या दोन दिवस आधी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या अजित पवारांना भेट नाकारून अमित शहा यांनी योग्य तो संदेश दिलेला आहेच. दोन-अडीच वर्षांत आणि आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप व फडणवीस यांनी एका दगडात दोन नाही तर चार पक्षी मारून खुर्द व बुद्रूक या शिवसेना व राष्ट्रवादीच्या चारही गटांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केलेला आहेच. यातून ते किती लवकर व कसे सावरतात यावर या चारही गटांचे भवितव्य अवलंबून आहे. परिस्थितीला शरण जाऊन चारही गटांतील बरेचशे मनसबदार भाजपच्या वळचणीला जातील असे दिसते. आगामी काळात जरांगेंचे उपद्रवमूल्य कमी करण्यासाठी अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा फक्त ‘मराठा चेहरा’ म्हणूनच कौशल्याने वापर करू घेतला जाण्याची शक्यता आहे. या कळसूत्री बाहुल्यांनी भाजपच्या तालावर नाचण्यास नकार दिल्यास त्यांना ईडी, सीबीआय, आयटी या स्वायत्त (?) यंत्रणांच्या ताब्यात द्यायला भाजपला कितीसा वेळ लागेल?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा