‘कोणते आंबेडकर?’ हा अग्रलेख (२३ डिसेंबर) वाचला. गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त विधानात योग्यच म्हटले की, आज राजकीय पक्ष आंबेडकरांचे नाव ‘फॅशन’ म्हणून वापरू लागले आहेत. बहुसंख्य पक्ष आंबेडकरांच्या नावाचा उपयोग केवळ मतांसाठी करतात, त्यांच्या विचारांशी तादात्म्य साधत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांचा बचाव करताना या वादाचे खापर काँग्रेसवर फोडले. त्यांनी डॉ. आंबेडकरांना कमी लेखल्याचा आरोप पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर ठेवला. सत्ताधाऱ्यांवर कोणी टीका केली, तर ती मान्य करून सुधारण्याऐवजी सत्ताधारी विरोधी पक्षाच्या चुका उकरून काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु, जेव्हा इतिहासातील घटनांचे दाखले दिले जातात, तेव्हा स्वत:च्या चुकाही अपरिहार्यपणे समोर येतात. उदाहरणार्थ, आंबेडकरांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलाचा हिंदू महासभा, आरएसएस आणि जनसंघ या संघटनांनी प्रखर विरोध केला होता, याचा भाजपला विसर पडला आहे. आंबेडकरांना हिंदू कोड बिल संमत होण्यासाठी थांबायचे नव्हते आणि जवाहरलाल नेहरूंना कट्टर हिंदुत्ववाद्यांचा विरोध शांत करण्यासाठी थोडा वेळ हवा होता. परिणामी डॉ. आंबेडकरांनी निराश होऊन मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा