‘ती ‘एआय’ होती म्हणुनी…’ हा अग्रलेख (७ जानेवारी) वाचला. ‘आम्हीही कुठे कमी नाही’ या न्यूनगंडातील आक्रमकतेचा वास्तवाशी कितपत मेळ घालता येईल? एआयचे गुलाबी चित्र रंगवून नेमका काय फायदा होणार आहे, याचा विचार करून भारताने एआयवर केल्या जाणाऱ्या खर्चातून किती फायदा होणार आहे, याचे गणित मांडण्याची गरज आहे. एआयच्या या ‘मूनशॉट चॅलेंज’मध्ये दहा हजार कोटी रुपये गुंतवणुकीची ‘एआय मिशन’ काढावीत, असे धोरणतज्ज्ञ डॉ. संदीप वासलेकर यांनीही सुचविले आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही केली आहे. मात्र भारताने या बाबतीत गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. हा निधी शिक्षण, आरोग्य, वीज, जलसिंचन, शेती, गृहनिर्माण याकडे वळवावा. ‘रॉकफेलर कॅपिटल मॅनेजमेंन्ट’चे प्रमुख रुचिर शर्मा यांनी एआयवरील गुंतवणुकीचा परतावा सुसंगत असेल का, अशी शंका उपस्थित केली आहे. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांची एआयमधील गुंतवणूक वर्षाला १० टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर गेली आहे. एखाद्या क्षेत्रात क्रांती होते तेव्हा नव्या कंपन्या त्याचा लाभ घेतात, असे रुचिर शर्मा यांचे निरीक्षण आहे. ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनीही एआयमधील प्रचंड भांडवली गुंतवणुकीऐवजी या क्षेत्रातील स्टार्टअपवर भर दिला आहे. गरिबीचे उदात्तीकरण करून रेवडी संस्कृतीची जोपासना केल्यामुळे देशावर ६६४ अब्ज डॉलर्सचे भलेमोठे कर्ज आहे. भारताने गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम ठरवण्याची वेळ आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा