‘राजकारण्यांची विश्वसनीयता कमी होत आहे’ असे भाजपचे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमधील कार्यक्रमात केलेले वक्तव्य (७ सप्टें.) वाचले. वस्तुस्थितीला धरूनच असणारे हे वक्तव्य नितीनजींनी नेमके कुणासंदर्भात केले आहे हे मात्र त्यांनी ऐकणाऱ्यांवर सोपविले आहे का? या वक्तव्याद्वारे त्यांना स्वपक्षीयांची कानउघाडणी करायची आहे की, इतर नेत्यांना कानपिचक्या द्यायच्या आहेत? महाराष्ट्र सरकार ज्या लाखो- कोट्यवधींच्या योजना रोज ऊठसूट जाहीर करते पण त्या पूर्ण करण्याची कुवत आहे का हे पाहिले जात नाही. तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्यासाठी नुसताच बोलघेवडेपणा सुरू आहे, त्याला उद्देशून नितीनजींनी हे वक्तव्य केले असेल तर ते बरोबरच आहे. परंतु इथेही, भाजपची इतर शीर्षस्थ नेतेमंडळी वारेमाप आश्वासने देत असताना त्यांचा एक नेता जनतेच्या बाजूने बोलत असल्याचे भासवून निवडणूक जिंकण्याची रणनीती तर आखली जात नसेल, कशावरून ?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा