‘विजेला धक्का’ हा अग्रलेख (११ सप्टेंबर) वाचला. ईव्ही मोटारींच्या उत्पादनासाठी दिलेल्या सवलती हळूहळू काढून घेण्याचा निर्णय उचितच आहे. मूल चालू लागले की पांगुळगाडा काढून घेतला जातो, तसेच हे आहे. भारतात अजूनही पर्यावरणस्नेही विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत नाही. परिणामी विजेवर चालणाऱ्या मोटारींमुळे पर्यावरणाचे रक्षण होते, या दाव्यात तथ्य नाही. आता प्रश्न आहे तो या मोटारींच्या घटत्या मागणीचा. ग्राहकांना मिळणाऱ्या सवलतींतही कपात झाल्यामुळे बऱ्याच ग्राहकांनी या वाहनांकडे पाठ फिरविली. अनेक ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था नाही. शिवाय चार्जिंगला खूप वेळ लागतो. कमी वेळात चार्ज होणाऱ्या, दर्जेदार व स्वस्त बॅटरी बाजारात येऊ घातल्याने ग्राहकही सध्या घाई न करता अशा बॅटरीच्या प्रतीक्षेत आहेत. सौर वा पवन ऊर्जेवर वीज निर्मिती करणारी चार्जिंग स्टेशन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तरच ईव्ही मोटारी खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही ठरतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा