‘इथेनॉल बंदीमुळे साखर उद्योग संकटात’ ही मुख्य बातमी आणि ‘पेटवा की विझवा?’ हा अग्रलेख (‘लोकसत्ता’- ११ डिसेंबर) वाचला. इथेनॉल आणि कांदा या दोन्ही कृषी उत्पादनांबाबत सरकारच्या कोणत्याही धोरणाचा परिणाम बाजारभावावर म्हणजेच शेतकऱ्यांच्या कमाईवर होतो. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना उसाचा दर थोडाफार का असेना वाढवून मिळू लागला. निर्यातीमुळे कांदा उत्पादकांनाही चांगला नफा मिळू लागला. मात्र इथेनॉलवर बंदी आणि कांदा निर्यातबंदी यामुळे दोन्ही उत्पादनांचे भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने १७०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे आणि आता ते कर्ज फेडणे कठीण असल्याचे बातमीत म्हटले आहे. हे कर्ज घेणाऱ्यांत धनदांडगे राजकारणीच अधिक असण्याची दाट शक्यता आहेत. ते सतराशे कोटींचे कर्ज कदाचित माफ करवून घेतील. किंबहुना कर्जमाफीसाठीच ही उत्पादनबंदी नाही ना, अशी शंका येऊ लागली आहे. ही बंदी घालताना ‘संभाव्य साखर भाववाढ’ हे कारण दिले गेले आहे. या बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि धनदांडग्यांचा फायदा होणार, हे स्पष्टच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा