परीक्षा घेण्यासाठी अर्ज मागवायचे, त्याबरोबर शुल्कही मागायचे; परीक्षा देणाऱ्यांनी तयारीही करायची, परंतु परीक्षा मात्र घ्यायचीच नाही असा प्रकार जेव्हा सरकारकडूनच घडतो, तेव्हा त्याबद्दल संताप व्यक्त होणे ही अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हटली पाहिजे. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांमधील साडेतेरा हजार रिक्त पदे भरण्यासाठी सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत नेमके असेच घडले आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यात आली, २०१९ मध्ये. मात्र आज तीन वर्षांनतरही ती रखडलेलीच आहे. वाढत्या बेकारीच्या पार्श्वभूमीवर नोकरभरतीकडे अक्षरश: डोळय़ांत प्राण आणून नजर ठेवून असलेल्या राज्यातील लाखो युवकांच्या जगण्याशी हा खेळ सुरू आहे. या परीक्षेसाठी सुमारे वीस लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्या सगळय़ांचा जीव टांगणीला लागलेला असताना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची एक कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांत फिरू लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा