शतकापूर्वी पाप-पुण्य, पतित-पवित्र इ. भेदांबाबतची कर्मठता विवाह, धर्मांतर इत्यादी बाबींच्या कर्मठतेइतकीच सनातन, शब्दप्रमाण, रूढीबद्ध होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबाबतही वेळोवेळी झालेल्या धर्मसभा आणि संमेलनांमधून धर्मसुधारणा आणि समाजपरिवर्तनसंबंधी आपला पुरोगामी आग्रह निकराने चालू ठेवल्याने हळूहळू त्यांच्या विचारांचे समर्थक निर्माण झाले. त्यामुळे काशीच्या अखिल भारतवर्षीय ब्राह्मण महासंमेलनातील वाढत्या हेकेखोरपणाचा निषेध करत तर्कतीर्थांनी काशीच्या टाऊन हॉलमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यास ३०हून अधिक धर्मपंडित उपस्थित होते. त्यांत बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या संस्कृत महाविद्यालयाचे प्रिन्सिपॉल प्रमथनाथ तर्कभूषण, महामहोपाध्याय देवीप्रसाद कविचक्रवर्ती, धर्मशास्त्राचार्य राधाप्रसाद प्रभृती मान्यवरांचा सहभाग होता, याची नोंद घेतली पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा