आरडाओरडा करत कोयते आणि दांडकी नाचवून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची विनाकारण तोडफोड करणारे, तोडफोडीला विरोध केल्यास ‘भाई’ असल्याचे सांगून नागरिकांच्या खिशातून पैसे काढणारे, खंडणी मागणारे, पिस्तूल हातात घेऊन ‘रील्स’ बनविणारे… असे अनेक तरुण सध्या समाजमाध्यमांतील दृश्यफितींतून समोर येत असतात. पिंपरी-चिंचवड शहरात असे ‘उद्योग’ सर्रास सुरू असतात. त्यामुळे उद्योगनगरीची गुन्हेनगरी होत आहे की काय, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र थांबविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहे. वेगाने नागरीकरण होणारे हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. शहराच्या सर्वच बाजूंनी मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून, लोकसंख्या २७ लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. या पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणी येतात. आयुक्तालयाचे एकूण कार्यक्षेत्र ११५ चौरस किलोमीटर इतके असून, अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या या कार्यक्षेत्रात येते. अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी, समाजमाध्यमावर होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण आणि संघटित गुन्हेगारी हे सर्व रोखण्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शहरातील अनेक जुन्या गृहनिर्माण सोसायट्या, उपनगरांतील बैठी घरे, गावठाण भागांमध्ये वाहनतळाची व्यवस्था नाही. परिणामी, नागरिक रस्त्यावर, पदपथावर वाहने लावतात. या वाहनांना समाजकंटक लक्ष्य करत असल्याचे दिसते. दहशतीसाठी कोयत्याने वाहनांची तोडफोड करून मोठे नुकसान केले जात आहे.

Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश

हेही वाचा…शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

गेल्या आठवड्यापासून पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोतिबानगर-काळेवाडी येथे १० जुलै रोजी एका टोळक्याने आरडाओरडा करून वाहनांची तोडफोड केली. याबाबत जाब विचारणाऱ्याला दमदाटी करून त्याच्या खिशातून पैसे काढून नेले. तापकीर चौक, काळेवाडी येथे दोघांनी १४ जुलै रोजी मध्यरात्री सहा वाहनांची तोडफोड केली. ‘मी इथला भाई आहे,’ असे म्हणत तोडफोडीला विरोध करणाऱ्या नागरिकास धमकी दिली. खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेऊन आणि कोयता हवेत फिरवून आरोपी निघून गेले. गेल्या आठवड्यात १७ जुलैला वाहनांची तोडफोड करून त्याबाबत जाब विचारणाऱ्या व्यक्तीला तिघांनी मिळून लुटले. पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. काळेवाडी येथे पुन्हा १८ जुलै रोजी नऊ वाहनांची तोडफोड झाली.

हेही वाचा…अन्वयार्थ : लोकसेवक की स्वयंसेवक?

पिंपरीगावातही सलग दोन दिवस वाहनांची तोडफोड झाली. पहिल्या दिवशी चार आणि दुसऱ्या दिवशी सहा वाहने फोडण्यात आली. रात्रीच्या वेळी तोडफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिसांची रात्रगस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ पुरेसे नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी गुन्हेगारांना वचक बसविणारे ‘पोलिसिंग’ करणे हेही महत्त्वाचेच आहे. नागरिकांवर दहशत गाजवून शहराला वेठीस धरणारी वृत्ती ठेचूनच काढावी लागेल.

ganesh.yadav@expressindia.com

Story img Loader