राजेश बोबडे

सांप्रदायिक बुवांच्या सामाजिक कार्याच्या कसोटीबद्दल तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारतवर्षांत जेव्हा जेव्हा मनुष्याच्या अवनतीचा व धर्माच्या भ्रष्टतेचा कळस होत गेला तेव्हा तेव्हा संतमहंतांनी, शास्त्रीपंडितांनी व शूरवीरांनी धर्माचे अधिष्ठान स्थापन करूनच समाजाला उन्नत केलेले दिसते. त्यांचीच तशी सामूहिक वचनेही सापडतात की, ‘मनुष्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाकरिता जगाचे नुकसान करणे हे जसे अतिपाप, तसेच आत्मज्ञान असताना समाजाला बंधन घालून त्याची वाढ आकुंचित भावनेने बंद करणे हेही महापापच समजले जाते.’

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

या त्यांच्या वचनाची ध्येयधारणा डोळय़ासमोर असताना समाज डोळय़ांपुढे आल्यानंतर, त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे ऐहिक व पारमार्थिक ज्ञान किती व कसे पुढे जाईल याची शंका वाटते. ती प्रामाणिकपणे विचार केल्यास बुवालोकांनाही वाटतच असावी, असे स्पष्ट करून महाराज म्हणतात, ‘‘दुसऱ्या बुवाजवळ गेल्यानेही जर त्यांच्या शिष्यगणांत बाधा येते तर धर्मावर विश्वासून असलेल्या लोकांचे ऐक्य कसे साध्य होणार? असे वाटू लागते. त्यांचे स्वतंत्र तत्त्वज्ञान ऐकले की वाटते, त्यांचा आणि जगाचा संबंध स्वप्नातही येत नसेल. फक्त येतो तो त्या मठातील झगडे सोडविण्यापुरताच! माझा मान कोणी का घेतला, या विषयाचा. अन्यथा लक्ष्यार्थाच्या चिंतनविषयाचा अर्थ संपला; असेच दिसून येते. इकडे जगाची परिस्थिती धर्मदृष्टय़ा किती बिघडली, लोक उद्योगधंद्यांच्या दृष्टीने किती पतन पावले, मनुष्यातील मनुष्यपणाचा किती ऱ्हास झाला, प्रत्येकात किती भित्रेपणा शिरला, लोकांत किती अन्याय्य वृत्ती वाढली, गुंड लोकांत किती शीलभ्रष्टता चढली, याचे दृश्य डोळय़ांसमोर आले म्हणजे सर्वात मोठा दोष धर्मप्रचारकांवरच का देऊ नये, असे वाटावयास लागते.’’

महाराज स्पष्ट करतात की, ‘‘धर्मप्रचारकांचा तो जिवंत इतिहास कुणीकडे, की ज्यांनी आपल्या डोळय़ांसमोर अन्याय्य वृत्ती दिसत असता आपले प्राण पणाला लावूनही समाजात धर्मतेज निर्माण केले. परंतु आजचे धर्मप्रचारकांचे कर्तव्य म्हणजे आपले जीवन कसे चालेल, याच्या वाटाघाटीत वाटेल त्यांची ‘हाजी हाजी’ करून आपल्या महत्त्वपूर्ण जीवनाचा व आपल्या धर्मात वर्णन केलेल्या तत्त्वज्ञानाचा नाश करणे एवढेच दिसून येते.’’ महाराज म्हणतात त्याला अपवाद नसतील, ‘‘असे माझे म्हणणे मुळीच नाही. परंतु सोन्यापेक्षा काशाचा आवाज अधिक असतो म्हणतात. त्यांतील सोन्याप्रमाणे असतील पडलेले ते कुठे! समजत असतील ‘आपलाच उद्धार’ अंतिम! लावीत असतील ते कुठे समाधी, करीतही असतील ते अधिकाऱ्यांना उपदेश; पण बहुजनसमाजाच्या या गोंधळाची वाट काय? या मार्गात त्यांचा प्रयत्न मुंगीच्या पावलाप्रमाणेच दिसणार नि ‘बुवा बुवा’ म्हणून गाजले जाणारे लोक आपल्या अल्पज्ञानाने लगेच पाप्यांचे बुवा होणार, ज्ञानही सांगणार, समाजात आधिपत्यही मिळवणार नि समाज कोणीकडे जातो याची पर्वाही करणार नाहीत!’’

rajesh772@gmail.com

Story img Loader