बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासनात वैद्यकीय शिक्षण विभागातील अंतर्गत राजकारणाचा शिरकाव झाला आहे. एकमेकांवर कुरघोड्या सुरू असून, त्यातून गेल्या वर्षीपासून अधिष्ठातापदाचा कार्यकाळ एकही व्यक्ती पूर्ण करू शकलेली नाही. आपल्या मर्जीतील अधिष्ठाता बसविण्यासाठी खटाटोप केला जात असून, त्याचा गंभीर परिणाम रुग्णसेवेसह एकूणच प्रशासनावर होत आहे.

आधी अधिष्ठातापदी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहत असे. गेल्या काही वर्षांचा विचार करता ‘ससून’च्या अधिष्ठातापदी डॉ. अजय चंदनवाले सर्वाधिक काळ राहिले. त्यांच्यानंतर आलेले अधिष्ठाता एक ते दोन वर्षे राहिले. गेल्या वर्षीपासून एकही अधिष्ठाता कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. यामुळे एकूणच महाविद्यालयासह रुग्णालयाच्या प्रशासनात अस्थिरता निर्माण झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागातील अंतर्गत राजकारणामुळे अधिष्ठात्यांची खुर्ची डळमळीत झाली आहे.

dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

हेही वाचा – पिंपरी : अलंकापुरीत वैष्णव दाखल! इंद्रायणीकाठी स्नानासाठी गर्दी, वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून इंद्रायणी नदी स्वच्छ

वैद्यकीय शिक्षण विभागात सध्या दोन गट पडले आहेत. हे गट आपापल्या व्यक्तीची नियुक्ती ससूनच्या अधिष्ठातापदी व्हावी, यासाठी मोर्चेबांधणी करतात. एका गटाचा अधिष्ठाता नेमण्यात आल्यानंतर दुसरा गट त्याला त्रास देण्यास सुरुवात करतो. अधिष्ठात्याला काम कसे करता येणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातात. त्याच्या मार्गात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जातात. यामुळे अधिष्ठाता स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास धजावत नाही. विभागात प्रबळ असेल त्या गटाचा अधिष्ठाता सुरक्षित असतो. मात्र, विभागातील राजकीय समीकरण बिघडल्यास त्याची खुर्ची पुन्हा असुरक्षित होते. याचबरोबर अधिष्ठातापद देण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची चर्चाही वैद्यकीय शिक्षण विभागात सुरू आहे.

ससूनमध्ये गेल्या वर्षीपासून चार अधिष्ठाता नेमण्यात आले. डॉ. संजीव ठाकूर यांना ललित पाटील पलायन प्रकरणात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर डॉ. विनायक काळे यांच्याकडे हे पद देण्यात आले. डॉ. काळे यांना या वर्षी मे महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यानंतर डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. डॉ. म्हस्के यांच्याकडील कार्यभार तीनच आठवड्यांत काढून डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे सोपविण्यात आला. डॉ. पवार हे मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख आहेत. ससूनमधील ज्येष्ठ प्राध्यापकांना डावलून डॉ. पवार यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. ससूनमध्ये असलेले उपअधिष्ठाता आणि ज्येष्ठ प्राध्यापकांकडे कार्यभार का सोपविला नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हेही वाचा – पुणेकरांना खुषखबर! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धाव

प्रशासकीय कारणाकडे बोट

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे होता. त्यांच्याकडे ससूनचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. त्यानंतर ससूनसाठी पूर्ण वेळ देऊ शकेल, असा अधिष्ठाता हवा म्हणून डॉ. एकनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली, असे प्रशासकीय कारण वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिले.

sanjay.jadhav@expressindia.com