मराठी चित्रपटांची नायिका ही काही निव्वळ अबोध ‘गाँव की गोरी’ नसते, हे अगदी ‘प्रभात’च्या काळातील शांता आपटे (कुंकू), शांता हुबळीकर (माणूस) यांनी दाखवून दिले होते. पुढल्या काळात उषा किरण यांनी तर सुशिक्षित, शहरी नायिका (पोस्टातील मुलगी, गरिबाघरची लेक, शिकलेली बायको) साकारली होती.. या नायिकांच्या मालिकेतील पुढला चेहरा सीमा देव यांचा! जयश्री गडकर आणि उमा या त्यांच्या समकालीन अभिनेत्री, पण सीमा देव यांनी भूमिका किती मोठी वा लहान याचा विचार न करता चित्रपट केले, पती रमेश देव यांना पडद्यावरही उत्तम साथ दिली. याचा परिणाम म्हणजे, ‘सरस्वतीचंद्र’(१९६८) मधील गाजलेल्या ‘मै तो भूल चली बाबुल का देस’ या गरबागीतात ‘ननदी में देखी है बहना की सूरत’ या ओळीत अभिनेत्री नूतनसह नाचणारी नणंद म्हणजे सीमाच आणि राजेश खन्ना- अमिताभ बच्चन यांच्या ‘आनंद’ चित्रपटात डॉ. प्रकाश कुळकर्णीची भूमिका करणाऱ्या रमेश देव यांना ‘तुमच्या जिभेला काही हाड?’ असे दटावणारी त्यांची पत्नी सुमनसुद्धा सीमाच. अशा अनेक लहान भूमिका त्यांनी हिंदीत केल्या, पण त्या लक्षात राहातील अर्थातच मराठी चित्रपटांतील ‘सुवासिनी’ म्हणून!

‘सुवासिनी’ हेच त्यांच्या आत्मचरित्राचेही नाव. विवाहाच्या पन्नासाव्या वर्षांचा योग साधून (२०१५) ते प्रकाशित झाले. अर्थात तोवर अनेक जाहीर मुलाखतींमधून रमेश आणि सीमा देव यांचा प्रवास उलगडला होताच. पूर्वाश्रमीच्या या नलिनी सराफला रमेश देव आजही ‘नलू’ म्हणतात, हे चित्रपटसृष्टीतील या लाडक्या जोडप्याचे गुपितही चारचौघांत माहीत झाले होते. पण ‘देव भेटण्या’आधीचे गिरगावातील बालपण आणि अभिनेत्री होण्याच्या इच्छेला त्या काळात आईने दिलेली साथ याचा उल्लेख या पुस्तकात येतो. ‘सुवासिनी’ या सुखान्तिकेत ग्रामीण सुखवस्तू घरातली मुलगी, एका सैनिकाच्या प्रेमात पडते आणि युद्धात तो ‘नाहीसा’ झाला असला तरी मरण पावलेला नाही, परत येईल या आशेवर जगते. ती तगमग सीमा यांनी उत्तमरीत्या मांडली. अभिनयाचे ‘राजा परांजपे स्कूल’ हे तोवरच्या भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम आदींपेक्षा निश्चितपणे निराळे! नाटकापेक्षाही सहजपणा चित्रपटांमध्ये वावरताना दिसायला हवा ही शैली ‘जगाच्या पाठीवर’मधल्या अंध मुलीच्या भूमिकेपासून अतिशय परिणामकारपणे सीमा यांनी वापरली.

Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : आम्ही गावकी, भावकी कधीच सोडली
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
dr ambedkar visited rss shakha opposed to buddhist councils organised by sangh parivar
पहिली बाजू : डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण

‘मोलकरीण’ या सुलोचना यांच्या अभिनयासाठी नावाजला गेलेल्या चित्रपटात सीमा यांची भूमिका ‘मॉडर्न’ सुनेची (याच प्रकारची भूमिका ‘जुनं ते सोनं’ या १९७५ सालच्या चित्रपटातही सीमा यांनी केली) होती. भूमिकेला वाव किती, याला महत्त्व न देता आपले काम योग्यरीत्या करायचे, हा त्यांच्या अभिनयाचा ‘स्वभाव’ त्या वेगळय़ा भूमिकांतूनही दिसून आला. ‘वरदक्षिणा’ (१९६२)मध्ये अखेरीस एक भाषणच सीमा यांच्या तोंडी होते. आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पाटील/ शबाना आजमींचा काळ दूर असताना, स्त्रीच्या आवाजाचा कणखरपणा सीमा यांच्या आवाजातून जाणवला होता. हिंदीतल्या त्यांच्या अनेकानेक लहान भूमिकांची यादी मोठी आहे, पण प्रभावी नाही. मराठीत मात्र, घरीदारी दिसणाऱ्या स्त्रीची प्रतिमा अधिक उजळ करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांचा लौकिक राहील.

Story img Loader