सजीवांतील साधर्म्य व वैधर्म्य जोखून त्यांचे वर्गीकरण केले जाते. पण प्रजाती किंवा प्रकार हे टप्पे नेमके कशावरून निश्चित केले जातात?

प्रदीप रावत

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. इंग्लंडवर जर्मन बॉम्ब हल्ले होत होते. प्राण वाचवण्यासाठी भुयारी खंदक खोदले गेले होते. पण लंडनमध्ये एक मोठी भुयारी व्यवस्था आधीच तयार होती. लंडनची भुयारी रेल्वे ऊर्फ ‘टय़ूब’. तिथे आसरा तर मिळत होता. पण त्यात एक भलताच वैताग सोसावा लागत होता. या भुयारात एका विशेष प्रकारचे डास होते. ते माणसांनाच चावायचे. त्या चावण्यामुळे आसऱ्याला आलेले पार हैराण व्हायचे. भुयारावरच्या जमिनीवर डास नव्हते असे मुळीच नाही. पण ते पाखरांवर झडप घालायचे. माणसांना त्यांचा ससेमिरा सहन करावा लागत नसे.  वैज्ञानिकांसाठी हे गौडबंगाल होते. स्वतंत्र जाती मानायच्या की एकच? एकाची गुजराण सस्तन प्राण्यांच्या रक्तावर होते, एवढय़ा एका फरकामुळे त्यांना स्वतंत्र प्रजात म्हणावे का? जातींचे प्रकार अनेक आहेत. वैविध्याची खरी पारख आणि मोजदाद विविध प्रजातींतील (इंग्रजीत स्पेशीज) भेदाला अनुसरून केली पाहिजे! डार्विनने आपल्या ग्रंथाचे नाव ‘ओरिजिन ऑफ स्पेशीज’ असे दिले होते ते या जाणिवेपोटीच!

उत्क्रांती विज्ञानातला हा फार कळीचा प्रश्न होता. जीवसृष्टीतील वैविध्याचा पसारा आणि आवाका फार फार अवाढव्य आहे. त्याचे आकलन करून घ्यायचे असेल, तर त्याची मोजदाद केली पाहिजे, हजेरी घेतली पाहिजे. पण त्याची संख्या भलतीच फुगेल! म्हणून ती पारखण्यासाठी बुद्धीच्या आवाक्यात आणि आटोक्यात राहील अशी वर्गीकरण व्यवस्था आवश्यक होती. म्हणजे त्यांच्यातील साधर्म्य आणि वैधर्म्य जोखून त्यांची अर्थपूर्ण गटवारी ऊर्फ वर्गीकरण करणे निकडीचे! या आकलनाच्या सोयीसाठी कार्ल लिनिअसने वर्गीकरणाचा घाट घातला. त्यांचे अगदी मोठे भेद मग पोटभेद, पोटभेदातील आणखी भेद अशी वर्गवारी करायची ती तरी कोणत्या आधारे? अर्थातच समानशील व्यसनेषु सख्यम्! एक समान लक्षणे आणि एकसमान गुण यांचा ताळमेळ साधत वर्गीकरणाचा आराखडा तयार केला गेला. वर्गीकरणाची एक उतरंडच त्यांनी जन्माला घातली. 

तुम्ही बिब्ब्याचे झाड पाहिले तर ते खूपसे आंब्याच्या झाडासारखे भासेल. पाने ठेवणीला आणि रंगाला बव्हंशी तशीच पण आकाराला थोडी मोठी आणि स्पर्शाला खरबरीत. हे झाले साम्य आणि भेद! त्यामुळे त्यांना एका मोठय़ा कुळातले जरूर मानावे लागते. पण अधिकाधिक लक्षणे न्याहाळत गेलो की त्यांच्यामधले वैधर्म्य आणि निराळेपण अधिक झळकू लागते. उतरंडीच्या पायऱ्या जसजशा खालीखाली येतात तसतशी साम्यापेक्षा भेदांची धार तेजाने तळपू लागते. जेथे आपण जाती या पायरीला पोहोचतो तेथून पुढे येतात ते त्याच जातीमधले असतात. त्यांना म्हणतात ‘प्रकार’! उदा. आंबा ही जाती आहे. हापूस, लंगडा, पायरी, चौसा हे त्यांचे प्रकार आहेत. या अर्थाने प्रकार ही अखेरची पायरी! पण ही उतरंड उतरता उतरता कोणत्या टप्प्यावरवर आपण जाती ऊर्फ स्पेसीज या टप्प्याला आलो, हे तरी कशावरून ठरते? दुसऱ्या शब्दात हाच प्रश्न विचारून बघू! कोणते वैशिष्टय़ आणि गुण लाभले असते तर हापूस आणि पायरी यांना आपण ‘प्रकार’ न म्हणता जाती म्हणून संबोधले असते? वर्गीकरणामधल्या प्रत्येक उतरंडीच्या पायरीवर हा प्रश्न विचारता येतो. प्रत्येक गटाची सरहद्द कशी ठरवायची? ही सरहद्द कायम असते की काळाच्या प्रवाहाबरोबर ओघाओघाने तिच्यात बदल होत राहतात?

आता पुन्हा डासांच्या उदाहरणाकडे पाहू या. सस्तन प्राण्यांच्या रक्ताला चटावलेले भुयारी डास हे पक्ष्यांच्या रक्तावर जगणाऱ्या डासांपेक्षा निराळय़ा जातीतले मानावेत की न मानावेत? कॅथरिन बायर्न आणि रिचर्ड निकोलस या दोन वैज्ञानिकांनी त्याचा छडा घेतला. लंडनमधील निरनिराळय़ा भागांतील डासांची लोकसंख्या पडताळली. डासांना एरव्ही जीवशास्त्रामध्ये क्युलेक्स पायपिएन्स असे नाव आहे. क्युलेक्स म्हणजे क्षुद्र माशीवजा आणि पायपिएन म्हणजे गुणगुण भुणभुण करणारा! जमिनीखाली भुयारी ठिकाणी आढळणाऱ्या डासांना क्युलेक्स पायपिएन्स मोलेस्टुस म्हणतात. मोलेस्टुस म्हणजे उच्छाद मांडणारे! या दोन्ही प्रकारचे डास त्यांनी जमविले. त्यांचे अध्ययन केले. एवढेच नाही तर त्यांचा अनेकदा परस्पर संकर करून बघितला! या सगळय़ा खटाटोपांतून त्यांच्या लक्षात आले ते असे! उच्छादी डासांची पैदास फक्त जमिनीखालच्या भागांमध्येच होते तर नेहमीच्या सामान्य डासांची भूपृष्ठांवर! उच्छादकारींचा समागम बंदिस्त जागीच होतो तर नेहमीच्या सामान्य डासांचा खुल्या जागेत! उच्छादींचे आश्रयी पसंती-लक्ष्य सस्तन प्राणी असते तर सामान्यांचे पक्षीवर्गावर! उच्छादींना अंडी घालायला रक्ताची गरज नसते तर सामान्यांना असते! विशेष म्हणजे उच्छादी डास वर्षांचा सर्व काळ कार्यरत असतात. पण सामान्य डास मात्र हिवाळय़ात निपचित असतात! त्यांना प्रयोगांती उमगलेली सर्वात कळीची बाब म्हणजे या दोहोंचा आपसात बिलकूल संकर होत नाही. संकराचे कितीही वेळा आटोकाट सायास केले तरी ते सगळे संकरी प्रजोत्पादनामध्ये निष्फळ ठरले!

जाती ऊर्फ स्पेशीज म्हणजे काय? अस्तित्वात असलेल्या जातींची निखळ आवृत्ती होत असेल तर त्याच तोंडावळय़ाच्या निराळय़ा जातींचा उद्गम कशा कशामुळे होतो? एकाच जातीमध्ये परस्पर संकर न होणाऱ्या शाखा कशा उपजतात? उत्क्रांती विज्ञानामधले हे कळीचे आणि काही अंगांनी गहन भासणारे प्रश्न आहेत. जीवसृष्टीची फक्त आजवरची नाही तर भावी जडणघडणीची उलाढाल कशी होईल? त्याचे आकलन होण्यासाठी जातिउद्भवाचे (इंग्रजीत स्पेसिएशन) कोडे फार मोलाचे आहे. या जातिउद्भवाचे कित्येक प्रकार आहेत. प्रत्येकाची ठेवण जराजराशी निराळी आहे. जाती स्थिर राहतातच असे नाही. त्यांचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत राहते. त्यांच्यामध्ये साकारत गेलेल्या बदलांमागे एकापेक्षा अधिक प्रक्रिया आहेत. त्यांचा जोम सर्वत्र, सर्वकाळ एकसारखा नसतो. परिणामी जातिउद्भव नावाचे कोडे निरनिराळय़ा पैलूंनी उलगडावे लागते. त्यांचे प्रवाही भिन्न रूप लक्षात घेताना अनेक व्याख्या उदयाला आल्या.

त्यातली एक मोठी व्याख्या बघू या.. जीवांच्या समूहाला जाती म्हणून एकत्र गुंफावे असे काय-काय असते? ज्यांना जाती म्हणून संबोधावे त्यांचे पूर्वज एका धाटणीचे एका वैशिष्टय़पूर्ण स्रोतांचे असतात. पण एवढेच नाही! त्यांच्या प्रजननातून उपजणारी भावी पिढी त्याच वैशिष्टय़ांच्या पताका मिरवीत अवतरते. म्हणजे फक्त समान भूतकाळ नव्हे तर समान ठेवणीचा भविष्यकाळदेखील व्याख्येमध्ये येऊन उभा ठाकला आहे. या व्याख्येमध्ये आपली नजर काळाच्या ओघात तगून राहणाऱ्या सातत्यावर खिळली आहे. पण हे परस्परांमधले आणि सतत तगणारे साम्य उपजणारी हमी येते कशामधून? तर यशस्वी फळदायी पुनरुत्पादनांमधून! म्हणून तर अर्न्‍सट मायेरसारख्या वैज्ञानिकाने जातींची व्याख्या करताना म्हटले की ज्यांच्यामध्ये परस्पर समागमातून यशस्वीरीत्या संतती फळते ते एका जातीचे! ही व्याख्या मोठी उपयुक्त संयुक्तिक आहे. पण त्याची व्याप्ती ज्या जीवांमध्ये लैंगिक उत्पादन होते त्यापुरतीच मर्यादित आहे. जिथे अलैंगिक रीतीने पुनरुत्पादन होते तिथे या वर्गीकरण कसोटीची मात्रा लागू होत नाही. असे असले तरी जीवसृष्टीच्या अफाट पसाऱ्यामधला एक थोराड हिस्सा या कसोटीच्या कवेत येतो.

परंतु त्यामध्ये इतर पैलू अनुत्तरित राहतात. उदा. ज्यांचे पूर्वी सफळ मीलन होत असे त्यांच्या नंतरच्या पिढय़ा निराळी गुणवैशिष्टय़े घेऊन बदलत राहतात आणि त्यातल्या काहींची परस्पर संकराची क्षमता मावळते! अशा बदलांची कारणे कोणती? जे बदल घडले त्यांना ‘नवीन जाती’ हे बिरुद कधी द्यायचे? कोणती, किती साम्ये वा भेदाभेद नगण्य मानायचे किंवा कळीचे म्हणून निराळी जात असल्याचे प्रशस्तीपत्रक द्यायचे? असे हे जातीच्या आत होत जाणारे विलगीकरण कशामुळे होते? म्हणजे कोणकोणत्या संभाव्य कारणांनी हे जातींचे विलगीकरण घडत जाते? अशाही अनेक लहान- मोठय़ा भेदांनी भारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. त्याचे निदान ओझरते दर्शन पुढच्या वेळी!

वर्गीकरणाचा नमुना

वनस्पती (साम्राज्य)

सपुष्प वनस्पती (विभाग)

द्विदल वर्ग  (वर्ग)

साबणभावी  (रांग)

उधोहृदयी (कुल)

मांगाधारी सहकारधारी ( प्रजाती )

हिंदूस्थानी (जाती )

प्रकार ( वाण) ( चौसा लंगडा हापूस )

उपप्रकार ( देवगडी हापूस )

वर्गीकरणाची समस्या आणि व्यवस्था उमजावी म्हणून हे जुन्या वळणाचे वर्गीकरण दाखवले आहे. आधुनिक वर्गीकरण निराळय़ा तत्त्वावर आहे. पण ते आकलनास अधिक क्लिष्ट भासेल. मांगा हे आंब्याचे मूळ तमिळ नाव आहे. त्यावरून युरोपात मँगो शब्द आला. त्यालाच संस्कृतात सहकार किंवा चूत फल म्हणतात.

Story img Loader