दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयू आणि वाद हे समीकरण नवीन नाही. त्यात आता विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरात आंदोलन, घेराव, उपोषण, घोषणाबाजी या सगळय़ास बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या नवीन आदेशाने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आदेशाचा भंग केल्यास २० हजार रुपये दंड किंवा विद्यार्थ्यांच्या हकालपट्टीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे. जेएनयू हे विद्यार्थी चळवळीचे केंद्र मानले जाते. डाव्या चळवळीचा प्रभाव असलेल्या या विद्यापीठातून पुढे आलेल्या अनेकांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला आहे. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील निर्मला सीतारामन आणि ए. जयशंकर हे मंत्री, माकपचे आजी-माजी सरचिटणीस सीताराम येचूरी आणि प्रकाश करात, जी-२० परिषद यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे भारताचे शेर्पा आणि माजी सनदी अधिकारी अमिताभ कांत, आक्रमक विद्यार्थी नेता अशी ओळख असलेले कन्हैया कुमार असे राजकारण, समाजकारण, सनदी सेवा अशा क्षेत्रांमध्ये या विद्यापीठातील विद्यार्थी चमकले आहेत. जेएनयूचा उल्लेख राजकीय पिढी तयार करणारी शाळा असा केला जात असे. १९७५ मध्ये आणीबाणीच्या विरोधात येथील विद्यार्थ्यांनी लढा दिला होता. सीताराम येचूरी, राष्ट्रवादीचे माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी तेव्हा आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आंदोलन, घेराव, वादविवाद हे या विद्यापीठाचे आजतागायत वैशिष्टय़ राहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा