‘तुम्हाला कळले कसे नाही की बँकॉक सेवेचा प्रारंभ आपण गुजरातमधून करतो आहोत म्हणून. देशातल्या बदललेल्या वातावरणाचा अभ्यास लोकांच्या संपर्कात येणाऱ्या तुमच्यासारख्यांनी करायलाच हवा. आता तेही तुम्हाला शिकवावे लागेल का?’ विमान कंपनीच्या परिचालन विभागाचे व्यवस्थापक कक्षात येरझारा घालत प्रश्नांची सरबत्ती करत होते व सुरत ते बँकॉक या शुभारंभाच्या विमानातील कर्मचारीवर्ग मान खाली घालून ऐकत होता. ‘या राज्याला, त्यातल्या लोकांना काहीही कमी पडू द्यायचे नाही, असा चंगच देशातील सर्वांनी बांधलाय, तोही २०१४ पासून. मग विमानात दारू कशी काय कमी पडली?’ यावर एक कर्मचारी म्हणाला. ‘सर, आपण आंतरराष्ट्रीय सेवेत ३०० आसनक्षमतेसाठी १५ लिटरच ठेवतो. तसे परिपत्रकच आहे कंपनीचे’ हे ऐकताच व्यवस्थापक पुन्हा भडकले. ‘या प्रकरणाचा गवगवा इतका झालाय की सरकार यात हस्तक्षेप करून ही लिटरची मर्यादासुद्धा वाढवू शकते. तेव्हा नाक कापले जाईल त्याचे काय? या विमानातील अनेकांनी दारू कशी काय संपली असे संदेश पोस्ट केलेत. काय उत्तर देणार त्यांना? जे पुढ्यात येईल ते फस्त करायचे. मग ते विरोधक असोत वा वस्तू, हाच या राज्यातील बहुसंख्यांचा स्वभाव. याची जाणीव साऱ्या देशाला गेल्या दहा वर्षांपासून होत असताना तुम्ही अनभिज्ञ कसे? जे काही भोगायचे ते मनसोक्त. मग ती सत्ता असो वा खाणेपिणे, हाच या सर्वांचा पिंड. जे हवे त्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नांची कसलीही कसर सोडायची नाही हाच या राज्याचा स्वभाव. त्यामुळेच त्यांनी प्रगती केली व आता देशाच्या प्रगतीला हातभार लावताहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा