अमृत बंग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्राच्या पंचवीसेक जिल्ह्यांतून आलेल्या, विविध प्रकारची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या ४६० तरुणांचे हे सर्वेक्षण काय सांगते..

तुमच्या-माझ्या दैनंदिन जीवनाचा भावना हा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहे असे तुम्हाला वाटते का? दस्तुरखुद्द चार्ल्स डार्विनला देखील याबाबत लिहिण्याचा मोह आवरला नाही. ‘द एक्स्प्रेशन ऑफ इमोशन्स इन मॅन अँड अ‍ॅनिमल्स’ या १८७२ साली प्रकाशित झालेल्या त्याच्या पुस्तकापासून ते आतापर्यंत सायकॉलॉजी आणि मेंदू विज्ञानात झालेल्या अफाट प्रगतीतून भावनांविषयीची आपली समज खूपच विस्तारली आहे. विचार- भावना – कृती यांचे त्रिकूट, त्यांचा एकमेकांशी असलेला परस्परसंबध, भावनांची उत्क्रांतीजन्य उत्पत्ती, त्यांचा उपयोग, शारीरिक व मानसिक आरोग्याशी असलेला त्यांचा घट्ट संबंध, मेंदूच्या विशिष्ट घटक आणि संरचनेमध्ये भावना कशा रुजलेल्या आहेत, इ. अनेक बाबतीत आज विज्ञान पुढे सरकलेले आहे. इतिहासात मानवी समूहाला जगताना भावनांचा कशा प्रकारे उपयोग होत गेला आणि त्या कशा ‘इवॉल्व्ह’ होत गेल्या याबाबत जॉन टूबी व लिडा कॉस्मिडस यासारख्या उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञांचे योगदान आणि आताच्या काळात नेतृत्व, टीम वर्क, ‘इंट्रा व इंटरपर्सनल इफेक्टिव्हनेस’ या अनुषंगाने भावनिक बुद्धिमत्तेचे (इमोशनल इंटेलिजेंस) महत्त्व या बाबत डॅनियल गोलमन सारख्यांचे काम यामुळे भावना हा निव्वळ हळवेपणे (!) बघायचा विषय नसून एक गंभीर बाब आहे याविषयी आधुनिक विज्ञान, मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र यांत एकमत आहे. यापलीकडे मानवी जीवनातील कला, साहित्य, चित्रपट, इ. क्षेत्रांचा देखील आपल्यावर होणारा परिणाम हा प्रमुखत: भावनिक असतो. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने डेकार्टच्या मते ‘आय थिंक देअरफॉर आय अ‍ॅम’ हा मानवी अस्तित्वाचा पाया आहे. पण इतर प्राण्यांपेक्षा असलेले आपले वेगळेपण, मनुष्यपण हे कदाचित ‘आय फील देअरफॉर आय अ‍ॅम (ह्युमन)’ यात रुजलेले आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अर्जेटिनात ‘ट्रम्प अवतार’!

विविध प्रकारच्या भावनांचे इंद्रधनुष्य अनुभवणे व त्या व्यक्त करता येणे हे म्हणूनच मानसिक स्वास्थ्याचे अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे. अन्यथा होणारे भावनिक कुपोषण वा कुचंबणा हे ‘मेंटल हेल्थ अँड वेलबीइंग’साठी फार त्रासदायक, प्रसंगी घातक आहे. या पार्श्वभूमीवर युवांच्या मनात काय सुरू आहे, ते विविध भावना कशा व किती प्रमाणात अनुभवतात, व्यक्त करतात हे जाणून घेण्याच्या दृष्टीने आम्ही निर्माणमध्ये ४६० युवांचा एक छोटासा अभ्यास केला. महाराष्ट्राच्या पंचवीसेक जिल्ह्यांतून आलेल्या, विविध प्रकारची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या या गटात २०६ तरुण व २५४ तरुणी होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळय़ा भावना या युवांनी किती वारंवारितेने अनुभवल्या व व्यक्त केल्या हे आम्ही त्यांना विचारले. यातील निवडक माहितीचे अगदी प्राथमिक विश्लेषण सोबतच्या तक्त्यात दिले आहे.

युवांच्या भावना-विश्वाची ही झलक बघून काही प्रश्न उपस्थित होतात: 

१) सगळय़ाच भावनांबाबत अनुभवण्याच्या वारंवारितेपेक्षा व्यक्त करण्याची वारंवारिता कमी आहे. त्यातही नकारात्मक वा अप्रिय (अन्प्लेझंट) भावनांबाबत व्यक्त होण्याचे प्रमाण विशेष कमी आहे. भावनिक अभिव्यक्तीमध्ये नेमक्या काय अडचणी युवा अनुभवतात ज्यामुळे ही तफावत दिसते?

२)इतरांचे शारीरिक वा मानसिक दु:ख बघून मनात उत्पन्न होणारी भावना म्हणजे करुणा. ५८% युवांनी ती अनेकदा वा खूप वेळा अनुभवली हे उत्तम. ‘तरुण पिढी आत्ममग्न आहे, तिला दुसऱ्यांचे काही पडलेले नाही’ असे त्यांच्या मनात डोकावून बघितले असता आपण म्हणणार नाही. मात्र केवळ २३% युवा त्यांना वाटलेली ही कणव त्याच वारंवारितेने व्यक्त करू शकले. असे का? युवांशी बोलताना त्यांनी सांगितलेली एक अडचण म्हणजे कॉलेज कॅम्पसवरील एकूण वातावरण हे करुणेच्या अभिव्यक्तीसाठी फारसे अनुकूल वा आश्वासक नाही. ‘क्युं सेंटी हो रहा है, फोकस ऑन युअर स्टडीज मॅन’ अशा वृत्तीने करुणेकडे ‘सेंटीमेंटॅलिझम’ म्हणून बघणे हे तिला अवनत करणे तर आहेच पण युवांच्या संवेदनशीलतेला मनाच्या कुष्ठरोगाकडे नेण्याची तालीम आहे का? 

३)आजूबाजूला सुरू असलेल्या वाईट गोष्टी वा अन्याय बघून वाटतो तो म्हणजे सात्विक संताप. ‘हे चूक आहे, असे नको व्हायला’ असा विचार व तद्नुसार बदलासाठीची कृती याला प्रवृत्त करणारी ही भावना. मात्र केवळ ५२ टक्के युवांनाच तसे तीव्रतेने वाटणे व त्यातही निव्वळ १७ टक्क्यांनीच ते व्यक्त करणे हे मला चिंताजनक वाटते. विद्यमान वास्तवाला आहे तसे न स्वीकारता त्याला बदलवण्याची धडपड करणे ही बंडखोरी युवावस्थेच्या सगळय़ात व्यवच्छेदक लक्षणांपैकी एक. त्या ऐवजी सत्ता, अधिकार यापुढे मान तुकवणे वा स्वहिताच्याच अधीन जाऊन व्यवस्थेला कुठलेही आव्हान न देणे असला ‘श्रावणबाळ निमुटपणा’ (कन्फोर्मिटी) आपण युवांमध्ये रुजवतो आहोत का?

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : एस. वेंकिटरमण

४)आनंद आणि दु:ख दोन्हीही मोठय़ा प्रमाणात अनुभवणे (८६% व ६१%) हे कदाचित जीवनाचे अविभाज्य अंग आहे. पण त्यांच्या अभिव्यक्तीच्या प्रमाणात असलेला प्रचंड फरक (६६% व १७%) कशामुळे? दु:खी वाटले तर नेमके कसे व्यक्त करायचे हे युवांना माहितीच नाही आहे का? की ‘काही कारणाने मी दु:खी आहे’ हे सांगणे ‘अनकूल’ मानले जाते म्हणून व्यक्त करण्यात संकोच पैदा होतो? मी अमेरिकेत ज्या विद्यापीठात शिकलो त्या युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये ‘पेन फेस’ हा शब्दप्रयोग प्रचलित होता. एका अत्यंत स्पर्धात्मक आयव्ही लीग विद्यापीठातील विविध बाबतीत निपुणता प्राप्त करण्याच्या चढाओढीत असलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या घोळक्यात ‘माझे सगळे कसे अगदी भन्नाट चालू आहे’ असे दाखवून कायमच एक उत्साही, आनंदी मुखवटा परिधान केलेला असणे म्हणजे ‘पेन फेस’. आपल्या युवांनादेखील असे काही प्रेशर जाणवते का? एकीकडे असला दबाव आणि दुसरीकडे ५० टक्क्यांना गिल्टी आणि ४३ टक्क्यांना एकाकी वाटणे अशा कात्रीत अडकल्यामुळेच की काय वरचेवर युवांमधील आत्महत्येचे प्रमाण व इतर मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत चालले आहेत का? आजच्या तथाकथित ‘कनेक्टेड’ जगात इतक्या मोठय़ा प्रमाणात युवांना ‘लोनली’ वाटणे आणि त्यातील केवळ ११ टक्क्यांना ते व्यक्त करता येणे हे आश्चर्यकारक, दु:खद आणि चिंताजनक आहे.

५) प्रेम, कृतज्ञता, कौतुक या सकारात्मक भावना देखील युवांनी अनुभवल्या आहेत. मात्र त्यांचीदेखील अभिव्यक्ती त्या प्रमाणात नाही जेवढी आनंदाची आहे. असे का व्हावे? आनंद ही मुख्यत: वैयक्तिक बाब व भावना असल्याने मी माझी व्यक्त करून मोकळा होऊ शकतो, त्यात इतरांवर, त्यांच्या प्रतिक्रियेवर फारसे अवलंबन नाही. तुलनेने प्रेम, कृतज्ञता, कौतुक या आंतरवैयक्तिक, परस्परसंबंधी भावना असल्याने त्या व्यक्त करताना समोरचा कसे घेईल, ‘योग्य’ प्रतिसाद देईल का, माझी टर उडवली जाईल का, इ. चिंता युवांना ग्रासतात का? इतक्या सुंदर भावनांचा आविष्कार मोकळेपणे, सहजपणे करता येणे हे युवांना कसे साध्य करता येईल?

या प्राथमिक अभ्यासातून इतरही अनेक प्रश्न व शक्यता पुढे येतील. पण सगळय़ात कळीचा मुद्दा म्हणजे युवांचे भावना-विश्व हे अनुभवाच्या आणि अभिव्यक्तीच्या पातळय़ांवर एक बहुरंगी इंद्रधनुष्य बनावे; रूक्ष, एकरंगी वा नीरस वाळवंट नाही, यासाठी आपल्याला काय करता येईल? 

संशोधन साहाय्य: आदिती पिदुरकर व डॉ.ओजस क्रिष्णानी