प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे यांनी २३ ऑक्टोबर, १९३१ रोजी संन्यास स्वीकारला आणि ते स्वामी केवलानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले, तीच त्यांची खरी ओळख ठरली. ‘धर्मकोश’, ‘मीमांसाकोश’निर्मितीची मूळ कल्पना त्यांची. या कोशांच्या प्राथमिक संदर्भग्रंथ (हस्तलिखिते) संकलन व प्राथमिक लेखन पद्धती निश्चिती व लेखन योगदान, इ. प्रकाराने तेच या कोशांचे मूळ उद्गाते. तर्कतीर्थांच्या जन्मवर्षीच म्हणजे सन १९०१ मध्ये नारायणशास्त्रींनी अध्यापनास प्रारंभ केला. पुढे १९०४ मध्ये त्यांनी आपले गुरू श्री प्रज्ञानंद स्वामी यांचे स्मरणार्थ प्राज्ञमठाची स्थापना केली. नंतर सन १९१६ मध्ये त्याचेच रूपांतर प्राज्ञपाठशाळेत करण्यात आले. ‘धर्मो विश्वस्य जगत: प्रतिष्ठा’ अर्थात् ‘धर्मामुळेच जगात स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त होते,’ हे ब्रीद घेऊन कार्य सुरू झालेल्या या पाठशाळेने पुढे स्वामी केवलानंद सरस्वतींच्या आधुनिक व कालसंगत शिक्षण देण्याच्या इराद्याने वेदशाळेचे रूपांतर राष्ट्रीय शाळेत झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या शाळेत सन १९१४ ला दाखल झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे १३ वर्षांचे होते.

गुरुमूर्ती प्रसन्न, तेजस्वी, उंच, गौरकाय होती. स्वामींची विद्यार्थ्यांवर निरंतर देखरेख असे. विद्यार्थ्यांच्या विद्याध्ययन व चरित्र व्यवहारावर गुरूंचे बारीक लक्ष असे. स्वत:च्या आचरणाने ते विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देत. महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारण चळवळीचे ते खंदे समर्थक होते. समाजसुधारणांना पाठबळ देण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांची वृत्ती संन्यस्ताचीच होती. ते बालब्रह्मचारी होते. परनिंदावर्जन, अमात्सर्य, अपरिग्रह गुणांनी संपन्न त्यांचे जीवन अनुकरणीय असेच होते. ईश्वरपूजेत डामडौल नसे. सदाचार साधना म्हणून ते ईश्वरभक्तीकडे पाहात. त्यांच्या निवासी संसारी चीजवस्तूंपेक्षा साधनेची साधने (ग्रंथ, हस्तलिखिते, कोश, इ.) अधिक होती. कुणी काही दिले (दक्षिणा म्हणून), तर लगेच ते विद्यार्थ्यांना देत. इतकी निरीच्छता त्यांनी दैनंदिन व्यवहारात जोपासली होती.

Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta tatva vivek Popularization of Western philosophy
तत्व विवेक: पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

शिक्षक म्हणून न्याय, व्याकरण, मीमांसा, वेदान्त, साहित्य अध्यापनात ते पारंगत होते. वक्तृत्व संपन्न नसले तरी वादचातुर्य शिकविण्यात स्वामी केवलानंदांचा हातखंडा होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादन केल्यानंतरच्या १९२३ ते १९३० या सप्तवर्षीय काळात वाई, सोनगीर, अकोला, हैदराबाद, काशी, प्रयाग, इ. ठिकाणी संपन्न विविध पंडित सभा, परिषदा, संमेलने, इ.मधून तर्कतीर्थ वादविवाद करत आणि धर्मसुधारणांद्वारे समाजसुधारणेचे प्रयत्न करत. त्या प्रत्येक ठिकाणी स्वामी केवलानंद सरस्वती उपस्थित असत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थ वादसभा गाजवत. अशा वादसभांमध्ये तर्कतीर्थांची बाजू लंगडी आहे असे जेव्हा लक्षात येई तेव्हा ‘हा तुमचा मुद्दा टिकणार नाही’ हे लक्षात आणून देत; पण सभेमध्ये ते समर्थनार्थ दुसरा पक्ष मांडून मूळ सुधारणांचे, परिवर्तनांचे आग्रही प्रतिपादन करीत. धर्म पंडित सभा, संमेलनांमध्ये स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या मतास किंमत होती व त्यांच्या मतांचा आदरही केला जात असे. तर्कतीर्थ पुरोगामी पंडित म्हणून विकसित झाले, ते मूळ गुरुवर्यांच्या दृष्टिकोनाचाच तो विस्तार होता.

स्वामी केवलानंद सरस्वती मोक्षमार्गी पंडित होते. मौनसाधना व धारणा यांवर नुसता विश्वास नव्हता, तर त्याचे ते अनेकदा अनुसरण करीत. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी यांच्या विचार नि कर्मसाधनेचे ते साधक होते. लोकमान्यांनी आपला ‘गीतारहस्य’ ग्रंथ स्वामींना श्रद्धापूर्वक भेट दिला होता, तसेच महात्मा गांधी अस्पृश्यता निवारण कार्यात त्यांचा विचार प्रमाण मानत. शास्त्रीय गायनाची त्यांना आवड होती.

धर्म परिवर्तनीय आहे, अशी त्यांची समन्वयी धारणा होती. ‘धार्यते इति धर्म:’ वचनात समाज, राष्ट्र, विश्व धारणेचा भाव आहे. कालसंगत सुधारणांची परंपरा धर्मात आहे. शब्दप्रामाण्यता, धर्मग्रंथांची अपौरुषेयता यावर स्वामींचा विश्वास नव्हता. धर्म मानव कल्याणाचे साधन असल्याने ते शोषण, भेदभावाचे साधन होऊ नये असे ते मानत आणि तसा व्यवहारही करीत. ‘धर्मो धारयति प्रज्ञा:’ वचनात हे अध्याहृत आहे, अपेक्षित आहे असे ते मानत. धर्मासंबंधी विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि भौतिकवादी दृष्टिकोन स्वामी केवलानंद सरस्वतींना आधुनिक विचारक सिद्ध करतो.

Story img Loader