प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे यांनी २३ ऑक्टोबर, १९३१ रोजी संन्यास स्वीकारला आणि ते स्वामी केवलानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले, तीच त्यांची खरी ओळख ठरली. ‘धर्मकोश’, ‘मीमांसाकोश’निर्मितीची मूळ कल्पना त्यांची. या कोशांच्या प्राथमिक संदर्भग्रंथ (हस्तलिखिते) संकलन व प्राथमिक लेखन पद्धती निश्चिती व लेखन योगदान, इ. प्रकाराने तेच या कोशांचे मूळ उद्गाते. तर्कतीर्थांच्या जन्मवर्षीच म्हणजे सन १९०१ मध्ये नारायणशास्त्रींनी अध्यापनास प्रारंभ केला. पुढे १९०४ मध्ये त्यांनी आपले गुरू श्री प्रज्ञानंद स्वामी यांचे स्मरणार्थ प्राज्ञमठाची स्थापना केली. नंतर सन १९१६ मध्ये त्याचेच रूपांतर प्राज्ञपाठशाळेत करण्यात आले. ‘धर्मो विश्वस्य जगत: प्रतिष्ठा’ अर्थात् ‘धर्मामुळेच जगात स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त होते,’ हे ब्रीद घेऊन कार्य सुरू झालेल्या या पाठशाळेने पुढे स्वामी केवलानंद सरस्वतींच्या आधुनिक व कालसंगत शिक्षण देण्याच्या इराद्याने वेदशाळेचे रूपांतर राष्ट्रीय शाळेत झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या शाळेत सन १९१४ ला दाखल झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे १३ वर्षांचे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा