‘धर्मकोश’ संपादनार्थ धर्मकोश मंडळाने हजारो संस्कृत हस्तलिखित ग्रंथ जमविले होते. त्यांच्या आधारे धर्मकोशाचे खंड तयार होत होते. परंतु या संग्रहित संस्कृत हस्तलिखित ग्रंथांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता किमान त्यांचा विवरणात्मक परिचय व्हावा, या उद्देशाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची’ (कॅटलॉग) दोन भागांत प्रकाशित करण्याची योजना आखून ती तडीस नेली. या विवरणात्मक सूचीत संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची माहिती इंग्रजीत देण्यात आली आहे. हेतू हा की, या हस्तलिखित ग्रंथांची माहिती जगास होऊन भविष्यकाळात यावर संशोधन व्हावे. या दोन्ही भागांमध्ये सुमारे ११ हजार पोथ्यांची माहिती आपणास होते. एकूण १५ रकान्यांत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आपणास प्रत्येक पोथीचे शीर्षक, पोथी लेखक, या हस्तलिखिताचा भाष्यकार, पोथीचे माध्यम (कागद, भूर्जपत्र, कापड, चामडे, इ.), पोथीची लिपी (देवनागरी, खरोष्ठी, चित्रलिपी, इ.), पोथी पृष्ठाचा आकार (सेंटिमीटरमध्ये), पोथीची पृष्ठसंख्या, प्रत्येक पृष्ठावरील ओळी, ओळीतील शब्दसंख्या, पोथी स्वरूप (पूर्ण, अपूर्ण, इ.), त्या हस्तलिखिताची स्थिती (जीर्ण, सुव्यवस्थित, इ.) तसेच पोथीचा काळ समजण्यास मदत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा