पाकिस्तानात जाऊन त्या देशाच्या संघाशी क्रिकेट सामने खेळावेत की नाही हा जेव्हा मुद्दाच नव्हता तेव्हा १९८२-८३ च्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला सपाटून पराभव पत्करावा लागला. या पराभवाच्या ‘शिल्पकारां’पैकी एक होते मोहिंदर अमरनाथ… पण हेच ‘जिमी’ऊर्फ मोहिंदर अमरनाथ, १९८३ मध्ये भारताला पहिलावहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघात इतके चमकले की, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत ते सामनावीर ठरले होते. त्यांची अख्खी कारकीर्दच अशी सापशिडीची का होती, याचं उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शोधायचं की क्रिकेटविषयीच्या दृष्टिकोनात? – हे कदाचित येत्या रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रातल्या ‘प्रायोगिक रंगमंचा’वर (एनसीपीए- एक्स्पेरिमेंटल थिएटर) त्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडेल. निमित्त आहे ‘फिअरलेस’ या मोहिंदर अमरनाथ यांच्या आत्मचरित्राचं. आणि प्रयोजन आहे, शुक्रवारपासून ‘एनसीपीए’च्या प्रांगणात सुरू झालेल्या ‘लिट लाइव्ह मुंबई लिटरेचर फेस्टिव्हल’चं!

ही बुकबातमी वाचणारे सर्वचजण क्रिकेटप्रेमी नसतील, पण मराठीप्रेमी तरी असतील… यापैकी कोणतं प्रेम खरं, याची कसोटी ‘लिट लाइव्ह’मध्ये लागणार आहे. ‘सलाम जयवंत दळवी’ हा कार्यक्रम प्रदीप वेलणकर, शैलेश दातार, सुहास जोशी आणि स्वाती चिटणीस यांच्या सहभागानं, लेखक- अभ्यासक राजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमका दुपारीच- साडेबारा वाजता, टाटा थिएटरला होत आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant dance on Afghan Jalebi song in bathroom video viral
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

रविवार हा या साहित्य-उत्सवाचा अखेरचा दिवस. ‘चिम्पान्झींच्या अभ्यासक’ म्हणून वाचकांना माहीत असलेल्या निसर्गप्रेमी अभ्यासक- लेखिका जेन गुडाल यांचं ‘रीझन्स फॉर होप’ हे व्याख्यान (संध्याकाळी ६, टाटा थिएटर) हे या दिवशीचं मोठं आकर्षण ठरेल; तर संध्याकाळी सव्वासातला ‘गोदरेज लिटरेचर लाइव्ह पुरस्कारां’च्या सोहळ्यानं हा तीन दिवसांचा उत्सव संपेल.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे

त्याआधी, शनिवारच्या दिवसाचं एक आकर्षण ठरेल ते ‘प्राचीन भारताचा व्यापक प्रभाव’ या विषयावरलं विल्यम डाल्रिम्पल यांचं व्याख्यान, तेही प्रशस्त ‘टाटा थिएटर’मध्येच संध्याकाळी ६.२० वाजता सुरू होईल. विल्यम डाल्रिम्पल यांनी भारताविषयी लिहिलेल्या पुस्तकांपैकी ‘द गोल्डन रोड’ हे सर्वांत नवं, त्याच्या प्रतींवर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी इथं झुंबड उडणारच, यावर उपाय म्हणून ‘किताब खाना’ या हुतात्मा चौकातल्या दुकानात या व्याख्यानाआधीच- कलत्या दुपारी चार वाजता डाल्रिम्पल फक्त सह्याजीराव या नात्यानं उपस्थिती लावणार आहेत.

पण त्याहीआधी शनिवारचं तितकंच महत्त्वाचं आकर्षण म्हणजे, महेश एलकुंचवार यांच्या ‘द क्रिएटिव्ह एसे’ या पुस्तकाचं कुमार केतकर यांच्या हस्ते अनावरण आणि मग अनहिता उबेरॉय यांच्याशी एलकुंचवारांच्या गप्पा. सकाळी ११.२० वाजता ‘लिटिल थिएटरमध्ये. आणि नेमकं त्याच वेळी ‘गोदरेज थिएटर’मध्ये, पिको अय्यर यांच्याशी ‘जेरुसलेम ते जपान’ या विषयावर गिरीश शहाणे यांचं संभाषण. आता, ही दोन्ही थिएटरं आसनसंख्येनं साधारण सारखीच आहेत. म्हणजे तेवढ्यावरनं निवड करण्याच्या फंदात पडायचं काही कारण नाही. पण हेच पिको अय्यर, पुन्हा संध्याकाळी पाच वाजता ‘टाटा थिएटर’मध्ये शोभा डे यांना प्रकट मुलाखत देणार आहेत. शनिवारीच जरा जेवणानंतर.

फारुख धोंडी आणि मर्झबान श्रॉफ यांच्या गप्पांचा गप्पांचा विषय- मुंबई/पुण्याबद्दलचे अनवट किस्से असा आहे. या गप्पा गोदरेज थिएटरला चार वाजता सुरू होतील. त्याआधी तीन वाजता, लिटिल थिएटरमध्ये, उडिया लेखिका प्रतिभा रॉय यांना यंदाचा ‘कारकीर्द गौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा सोहळा होईल. दोन वर्षांपूर्वी हा गौरव एलकुंचवारांना मिळाला होता. एकंदरीत, कुठल्याही चांगल्या सांस्कृतिक उत्सवाप्रमाणे यंदाच्या टाटा लिट लाइव्हमध्येही ‘इथं जाऊ की तिथं जाऊ?’ अशी गत पुढल्या दोन दिवसांत होणार आहे… तेव्हा निवड करायला सिद्ध राहा… पण न जाऊन पस्तावू नका. जाण्याच्या आधी नोंदणी मात्र करावी लागेल, त्यासाठी दुवा : www.litlive.in/fest2024/register