पाकिस्तानात जाऊन त्या देशाच्या संघाशी क्रिकेट सामने खेळावेत की नाही हा जेव्हा मुद्दाच नव्हता तेव्हा १९८२-८३ च्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला सपाटून पराभव पत्करावा लागला. या पराभवाच्या ‘शिल्पकारां’पैकी एक होते मोहिंदर अमरनाथ… पण हेच ‘जिमी’ऊर्फ मोहिंदर अमरनाथ, १९८३ मध्ये भारताला पहिलावहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघात इतके चमकले की, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत ते सामनावीर ठरले होते. त्यांची अख्खी कारकीर्दच अशी सापशिडीची का होती, याचं उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शोधायचं की क्रिकेटविषयीच्या दृष्टिकोनात? – हे कदाचित येत्या रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्रातल्या ‘प्रायोगिक रंगमंचा’वर (एनसीपीए- एक्स्पेरिमेंटल थिएटर) त्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडेल. निमित्त आहे ‘फिअरलेस’ या मोहिंदर अमरनाथ यांच्या आत्मचरित्राचं. आणि प्रयोजन आहे, शुक्रवारपासून ‘एनसीपीए’च्या प्रांगणात सुरू झालेल्या ‘लिट लाइव्ह मुंबई लिटरेचर फेस्टिव्हल’चं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा