डीरॅम चिपनिर्मिती हा इंटेलच्या अस्मितेचा भाग.. पण पुन्हा उभारी धरण्यासाठी हे उत्पादन थांबवण्याचा  निर्णय झाला; तो कसा?

अमृतांशु नेरुरकर,‘चिप’-उद्योगात कार्यरत असलेले तज्ज्ञ.

How To Use Roti Checker AI
AI For Roti : महिलांनो! आता एआय घेणार तुमच्या स्वयंपाकाची परीक्षा; पोळीला देणार गुण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mukesh Ambani
Mukesh Ambani On AI : ChatGPT च्या वापराबाबत मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना खास सल्ला; म्हणाले, “लक्षात ठेवा कृत्रिम बुद्धीने नव्हे…”
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
best started fillingats inviting applications for Joint Assistant in electrical department
अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू
Deepsea warning for America Donald Trump advice to American companies to pay more attention
‘डीपसीक’ अमेरिकेसाठी इशारा!; ट्रम्प यांची अमेरिकी कंपन्यांना अधिक लक्ष देण्याची सूचना
China Chinese Artificial Intelligence startup DeepSeek
अमेरिकेच्या ‘टुकार’ चिपनिशी चीनचा भन्नाट तंत्राविष्कार…चायना-मेड ‘DeepSeek’ चॅटबोटने जगभर खळबळ का उडवली?

‘कोणत्याही प्रकारचं यश हे आत्मसंतुष्टतेला जन्म देतं; आणि आत्मसंतुष्टी अपयशाला!’ ‘स्पर्धेचं भय, दिवाळखोरीचं भय, चुकण्याचं भय, पराभवाचं भय – मानवाच्या किंवा त्याने उभारलेल्या संस्थेच्या पुनरुत्थानासाठी या अत्यंत प्रभावशाली प्रेरणा आहेत.’

इंटेलचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी ग्रोव्ह यानं त्याच्या जगप्रसिद्ध ‘ओन्ली द पॅरानॉईड सव्‍‌र्हाइव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकात मांडलेले हे विचार त्याच्या काहीशा आक्रमक पण असामान्य नेतृत्वशैलीची प्रचीती देतात. दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत नाझी दहशतीच्या छायेतल्या हंगेरीमध्ये अत्यंत हलाखीत बालपण गेलेल्या पण पुढे शब्दश: ‘अमेरिकन ड्रीम’ जगलेल्या ग्रोव्हचा जीवनप्रवासही तेवढाच असामान्य आणि प्रेरणादायी आहे. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि पुढे १९९० नंतर इंटेलनं घेतलेल्या गरुडभरारीचं पुष्कळसं श्रेय हे अँडी ग्रोव्हला द्यावंच लागेल.

त्या काळात अमेरिकेतल्या केवळ संगणक आणि तत्सम उपकरणं बनविणाऱ्या कंपन्याच नव्हेत तर अमेरिकी लष्करापासून जवळपास सर्वच क्षेत्रांतील लहान-मोठे उद्योग त्यांच्या दैनंदिन परिचालनासाठी जपानी चिपवर अवलंबून होते. चिप उत्पादन तसंच त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि एकंदरच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जपानी स्पर्धेला तोंड देणं अमेरिकी कंपन्यांसाठी दिवसागणिक अवघड होत चाललं होतं. इंटेलचीही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. ज्या कंपनीने डीरॅम मेमरी चिपची मुहूर्तमेढ रोवली होती आणि एकेकाळी जिची या क्षेत्रावर अक्षरश: मक्तेदारी होती, तिचा १९८५ पर्यंत मेमरी चिपमधला बाजारहिस्सा पाच टक्क्यांहूनही खाली घसरला होता. असं असूनही इंटेल फोटोलिथोग्राफीसारखी चिपनिर्मिती उपकरणं आणि कॅपॅसिटर, सब्स्ट्रेटसारख्या कच्च्या मालासाठी जपानवरच अवलंबून होती.

या बाह्य आव्हानांसोबत त्या काळात इंटेल नेतृत्वबदलाच्या संक्रमणावस्थेतूनही जात होती. इंटिग्रेटेड सर्किट तंत्रज्ञानाचा सहसंशोधक आणि इंटेलचा सहसंस्थापक रॉबर्ट नॉईस तेव्हा ‘सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज असोसिएशन’मार्फत अमेरिकी चिपनिर्मिती उद्योगासाठी सरकारकडून भरीव मदत मिळवण्याच्या कामात संपूर्णपणे गुंतला होता. पुढे अमेरिकी चिप कंपन्या आणि संरक्षण खातं यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन केल्या गेलेल्या ‘सेमाटेक’ या संस्थेच्या प्रमुखपदाची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. साहजिकच इंटेलच्या दैनंदिन कामकाजामध्ये नॉईसचा फारसा सहभाग नव्हता.

गॉर्डन मूर पूर्णत: इंटेलसाठीच काम करत असला तरी त्यानं त्याचं लक्ष हे अधिक करून चिप तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण संशोधनावर केंद्रित केलं होतं. अशा परिस्थितीत इंटेलचं नेतृत्व मूर आणि नॉईससोबत फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरपासून काम करणाऱ्या आणि त्यांच्या सोबतीनं इंटेलच्या स्थापनेपासूनच आपलं योगदान देणाऱ्या अँडी ग्रोव्हकडे चालून आलं. ग्रोव्हची नेतृत्वशैली त्याच्या पूर्वसूरींपेक्षा संपूर्णपणे भिन्न होती. नॉईस आणि मूर या इंटेलच्या सहसंस्थापकांची नेतृत्वशैली सिलिकॉन व्हॅलीमधील इतर नवउद्यमींसारखी तंत्रज्ञानाधिष्ठित व संशोधनस्नेही होती. त्यांचं लक्ष हे नवकल्पना, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान या बाबींवरच सतत केंद्रित झालेलं असे. सेमीकंडक्टर चिपसारख्या ‘हाय-टेक’ उद्योगासाठी हे गरजेचं असलं तरी तेवढंच पुरेसं नक्कीच नव्हतं.

चिप उत्पादनासाठी प्रचंड प्रमाणात भांडवल गुंतवायला लागत असल्याने अधिक परतावा मिळवण्यासाठी घाऊक प्रमाणात उत्पादन करणं क्रमप्राप्त होतं. आणि त्यासाठी जपानप्रमाणे शिस्तप्रिय परिचालन आणि कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया राबवण्याची आवश्यकता होती. हे साध्य करण्यासाठी ग्रोव्हची नेतृत्वशैली अत्यंत समर्पक होती. बालपणापासून बसलेले गरिबीचे चटके, जन्माने ज्यू असल्यानं हंगेरीच्या तत्कालीन अतिउजव्या राजवटीकडून मिळत असलेली दुय्यम वागणूक, किंवा नाझी दमनशाहीचा अत्यंत जवळून घेतलेला अनुभव (त्याचे वडील दुसऱ्या महायुद्धात नाझींसाठी लढताना सोव्हिएत रशियाच्या सैनिकांकडून मारले गेले होते तर त्याच्या आईवर नाझी सैनिकांनी बुडापेस्टवर केलेल्या चढाईदरम्यान बलात्कार केला होता) – कारण काहीही असो, ग्रोव्हची नेतृत्वशैली ही अत्यंत कर्तव्यकठोर, कडक शिस्तीचा आग्रह धरणारी आणि वरकरणी अप्रिय वाटलं तरीही कंपनीच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी आवश्यक ते निर्णय भावनाशून्यतेनं- प्रसंगी निर्दयपणानं – घेणारी अशी होती.

सिलिकॉन व्हॅलीमधल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा करणाऱ्या वातावरणाशी ही शैली विसंगत असली तरीही ढासळत्या परिस्थितीतून इंटेलला सावरण्यासाठी ती गरजेची होती. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला इंटेलच्या भवितव्यावर लक्षणीय परिणाम करू शकतील असे दोन महत्त्वाचे प्रश्न आ वासून समोर उभे होते. या दोनही प्रश्नांना भिडून त्यांचा लवकरात लवकर तड लावण्याची आवश्यकता होती. प्रश्न क्रमांक एक – इंटेलनं डीरॅम मेमरी चिप उत्पादनातून बाहेर पडावं का? आणि प्रश्न क्रमांक दोन – चिप उत्पादन प्रक्रियेत जपानी कंपन्यांसारखी कार्यक्षमता इंटेलनं कशी आत्मसात करावी?

तसं बघायला गेल्यास पहिला प्रश्न इंटेलला १९७५ पासूनच भेडसावत होता. जपानी कंपन्यांच्या रेटय़ासमोर इंटेलची मेमरी चिपनिर्मितीत तेव्हापासूनच पीछेहाट होत होती. जपानी चिपची वाढती कार्यक्षमता, अमेरिकी चिपच्या तुलनेत अधिक कालावधीसाठी चालण्याची हमी आणि किफायतशीर किंमत या सर्वामुळे इंटेलचे मेमरी चिपचे ग्राहक दुरावत चालले होते. महसूल तर कमी होत होताच पण गुंतवणुकीवरचा परतावाही रसातळाला जात होता. १९८० पासून तर हा उद्योग तोटय़ात जाईल की काय अशी रास्त शंका इंटेलच्या नेतृत्वाला येऊ लागली होती.

असं असूनही १९८५ सालापर्यंत इंटेलनं मेमरी चिपनिर्मितीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नव्हता. खरं सांगायचं तर मेमरी चिपनिर्मितीतून इंटेलनं बाहेर पडावं असं कंपनीतील कर्मचारी, कंपनीचे भागधारक किंवा वॉल स्ट्रीटवरील विश्लेषक यांपैकी कोणालाच वाटत नव्हतं. अगदी गॉर्डन मूरदेखील याच मताचा होता. इंटेलसाठी मेमरी चिपनिर्मिती हा ‘कंपनीच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक’ होता. या तंत्रज्ञानाचा शोध इंटेलनंच लावला होता आणि या चिपच्या सुरुवातीच्या जडणघडणीत तसंच तिच्या घाऊक उत्पादन प्रक्रियेची संरचना तयार करण्यात इंटेलचा सिंहाचा वाटा होता. अशा पार्श्वभूमीवर इंटेलनं मेमरी चिपनिर्मिती उद्योगातून सरसकट बाहेर पडणं बहुतेकांच्या पचनी पडत नव्हतं. हे म्हणजे आयबीएमने संगणक किंवा एचपीने पिंट्रर बनविण्याच्या उद्योगातून बाहेर पडण्यासारखं होतं!

इंटेलशी जोडलेल्या प्रत्येकाचंच मेमरी चिपशी एक भावनिक नातं तयार झालं होतं आणि काही प्रमाणात त्याच भिंगातून या प्रश्नाकडे पाहिल्यामुळे ‘इंटेलने या व्यवसायातून बाहेर पडू नये’ या निर्णयाप्रत ते सारेजण येऊन पोहोचले होते. ग्रोव्ह मात्र या सर्व प्रकाराकडे वस्तुनिष्ठपणे, रोकडय़ा व्यवहारवादाच्या दृष्टिकोनातून पाहात होता. गेल्या पाच सात वर्षांतील आकडेवारी आणि या क्षेत्रातल्या विश्लेषकांनी पुढल्या पाच वर्षांसाठी मेमरी चिपनिर्मिती उद्योगाच्या वाढीसंदर्भात वर्तवलेल्या अंदाजांचं विश्लेषण केल्यास एक गोष्ट ग्रोव्हला साफ दिसत होती. जपानी कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेला सामोरं जाताना इंटेलसाठी या क्षेत्रात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेणं निव्वळ अशक्य होतं. इतके स्पष्ट संकेत मिळत असूनही जर मेमरी चिपनिर्मिती उद्योगातून केवळ भावनिक कारणांमुळे इंटेल अजूनही बाहेर पडली नाही, तर नजीकच्या भविष्यात कंपनी दिवाळखोरीत निघेल याची ग्रोव्हला प्रकर्षांनं जाणीव झाली.

 अखेरीस १९८५ मध्ये ग्रोव्हने इंटेलने डीरॅम मेमरी चिपनिर्मितीतून बाहेर पडावं हा आपला निर्णय कंपनीच्या उच्चपदस्थांसमोर बोलून दाखवला. अपेक्षेप्रमाणे या निर्णयाला मूरसकट इतर सदस्यांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. ग्रोव्ह मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. या विषयावरच्या एका चर्चेदरम्यान ग्रोव्हनं इतर सदस्यांना प्रश्न केला की जर आज इंटेलनं कंपनीबाहेरून निवडलेल्या एका नव्या सीईओ माझ्या जागी बसवलं तर डीरॅम चिपच्या कमी होत चाललेल्या किमती, घटता नफा, सतत घसरत चाललेली अनियमित मागणी आणि कच्च्या मालाच्या पुरवठादार जपानी कंपन्यांसोबतचे ताणलेले संबंध – या सर्व बाबी लक्षात घेता डीरॅम चिपच्या बाबतीत तो काय निर्णय घेईल? आता मात्र बहुतेक सर्व सदस्यांचं, ‘तो नवा सीईओ इंटेलने डीरॅम मेमरी चिपनिर्मितीतून बाहेर पडावं या निर्णयाप्रत येईल’, हे मत पडलं.

बऱ्याच भवति-न-भवतीनंतर ग्रोव्ह आपला निर्णय संचालक मंडळाच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरला. १० ऑक्टोबर १९८५ रोजी इंटेलनं डीरॅम मेमरी चिपनिर्मितीमधून कायमस्वरूपी बाहेर पडण्याचा आपला निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आणि एप्रिल १९८६ पासून आपल्या प्रत्येक कारखान्यातून मेमरी चिपनिर्मिती प्रक्रिया हद्दपार केली. ‘डीरॅममधून बाहेर पडणं हा इंटेलने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट निर्णयांपैकी एक होता,’ असं ग्रोव्ह नंतरच्या काळात का म्हणाला याचं विश्लेषण पुढल्या सोमवारी!

Story img Loader