राजेश बोबडे

भक्तीमार्ग सोपा नाहीच हे स्पष्टच करून स्वत:ला भक्त म्हणून मिरविणाऱ्या अपप्रवृत्तीविषयी विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘आपल्या घरातील माणसांनासुद्धा मनुष्य आपलेसे करू शकत नाही. एवढेच कशाला आपल्या वृत्तीला विचाराने आपलेसे करू शकत नाही. व्यवहारातील निश्चय किंवा कोणास दिलेला विश्वासही एकसारखा टिकवू शकत नाही की पूर्ण करू शकत नाही. शेजारच्या माणसाला प्रसंगी कवडीचीही मदत करू शकत नाही, की मानपानाचा दुराभिमान दूर सारू शकत नाही. विश्वासपात्रता, व्यवहारांतील मानमर्यादा, दुसऱ्याचे कटुशब्द सहन करण्याची ताकद या गोष्टीही ज्यात आल्या नाहीत, जो बेफामवृत्तीला आवरू शकत नाही व प्रसंगी आवश्यक असताही इंद्रियांना इष्ट वळण देऊन यमनियम पाळू शकत नाही. आपत्काळी ज्याचा भाव टिकत नाही व करारीपणा ज्यात मुळीच नाही, व्यवहारात ज्याने आपली सहजता ठेवली नाही, इतकेच नव्हे तर माणुसकी किंवा घर सत्याने सांभाळणे याचीही ज्यास यथार्थ जाणीव नाही, त्याने- ईश्वरभक्ती सोपी आहे बुवा! असे म्हणणे म्हणजे ईश्वरासहित आपली थट्टा करून घेण्यासारखेच आहे. या आचारविचारांना सोडून जर तो हरिभक्ती करील तर त्याची ही कोरडी भक्ती ऐकावयास कोण तयार आहे?

loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
sharad pawar atheist marathi news
Sharad Pawar: “माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो”, शरद पवार म्हणाले…

महाराज अनुभव सांगताना म्हणतात, ‘मी काही लोकांना असे म्हणताना पाहिले आहेत की- आता आपल्याच्याने दुसरं काय होतं? मुलगाही ऐकत नाही नि घरचे लोकही तिरस्कार करतात. स्वतंत्र राहावं तर पैसा नाही व गृहस्थाश्रम चालवावा तर लक्ष्मी (पत्नी) मेलेली. बरं, एवढं सहन करून राहावं तर कर्जामुळे सावकार दम पलटू देत नाही. मग आता दुसरा कोणता मार्ग आहे हरिभक्तिशिवाय? बस, खुशाल रामनाम घ्यावं आणि म्हणावं मला हरिभक्ताला द्या भोजन. म्हणजे आपले भोजनही निभते आणि लोक पायाही पडतात. शिवाय काही दक्षिणा आली की आडून छपून व्यसनेही पुरी होतात.

मग सांगा कितीतरी सोपी वाट आहे ही भक्तीची! वा रे भक्त – शिरोमणि! आपले घर चालत नाही- निर्वाह होत नाही- म्हणून का हा वेष घ्यावयाचा असतो? आणि तो घेतलाही तरी लोक का इतके वेडे आहेत? पाहतात अशा भक्ताचा स्वभाव आणि करतात त्याची थट्टा नि उतरवतात पाणी कसे चढले आहे ते.असले लोक भक्तीच्या नावाने आपले जमत नाही म्हणून लोकांची हांजी हांजी करू लागतात आणि तीही जर साधत नसली तर लावलगाईचा धंदा सुरू करतात. त्यात जर का मार मिळाला तर उचलतो सोटादुपट्टा नि जातो तीर्थातील सदाव्रतावर. तिथेही परीक्षा झाली की लागतो दारोदार भिक्षा मागायला. त्यातही पुरे पडले नाही की होतो चोरांचा सोबती आणि जातो कृष्णमंदिरात. एकंदरीत मग पश्चात्ताप करू लागतो की- मी मजुरी करून पोट भरलं असतं तर घरी सुखाने राहिलो असतो. कळली का भक्ती कशी सोपी आहे ती? काय लाभ होतो अशा अनधिकाऱ्यांच्या भक्तीमुळे? त्याला तर ते भोगणे पडतेच परंतु लोकांची धर्मभावना या बहाद्दरांच्या गोंधळामुळे कलुषित होऊन अश्रद्धा निर्माण होते.’